जेव्हा शाहरुख खानने मुकेश अंबानींच्या मुलाला विचारली होती पहिली सॅलरी...

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 30 November 2020

हा किस्सा २०१७ सालचा असून बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानशी संबंधित आहे. रिलाईंसची ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंबानी कुटुंबाने गुजरातच्या जामनगरमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता.

मुंबई- देशाचे सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबामुळे अनेकदा चर्चेत असतात. अंबानी कुटुंबाचा बॉलीवूडशी अनेक काळापासूनचा जुना संबंध आहे. बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी अंबानी कुटुंबियांच्या लग्नसोहळ्यात किंवा कोणत्याही खास सोहळ्यात आवर्जुन हजर असतात. आज त्यांच्याशीच संबंधित असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हे ही वाचा: अभिनेत्रीने कास्टिंग डिरेक्टरवर केला बलात्काराचा आरोप, वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल  

हा किस्सा २०१७ सालचा असून बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानशी संबंधित आहे. रिलाईंसची ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंबानी कुटुंबाने गुजरातच्या जामनगरमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर याचं सुत्रसंचालन शाहरुख खानने केलं होतं. यावेळी शाहरुख त्याच्या नेहमीच्याच अंदाजाच मजा मस्ती करत होता. त्याने आकाश आणि ईशा अंबानीसोबत स्टेजवर डान्स देखील केला. यादरम्यान त्याने मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीसोबत गप्पा मारल्या. अनंतने सांगितलेल्या एका गोष्टीवरतर शाहरुखचा विश्वासंच बसला नाही. 

शाहरुख यावेळी अनंत अंबानीला त्याच्या पहिल्या सॅलरीविषयी सांगतो आणि नंतर त्याला त्याची पहिली सॅलरी विचारतो. यानंतर अनंतने दिलेलं उत्तर ऐकून शाहरुखची बोलतीच बंद होते. शाहरुख अनंतला सांगतो की त्याची पहिली सॅलरी ५० रुपये होती आणि त्याने हे पैसे पंकज उधास यांच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये वॉलेंटिअर बनून कमावले होते. यानंतर तो अनंतला सॅलरी बद्दल विचारतो तेव्हा अनंत म्हणतो, ''तुम्ही हे राहु द्या. जर मी माझी पहिली सॅलरी सांगितली तर तुम्हाला लाज वाटेल.'' शाहरुख हे ऐकून गप्प बसतो आणि कार्यक्रमातील इतर लोकांमध्ये एकच हशा पिकतो.   

when shah rukh khan asked to mukesh ambani son anant ambani his first salary  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when shah rukh khan asked to mukesh ambani son anant ambani his first salary