अभिनेत्रीने कास्टिंग डिरेक्टरवर केला बलात्काराचा आरोप, वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 30 November 2020

पोलिसांनी वेब सिरीज आणि सिनेमात काम करणा-या या अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार आयपीसी कलम ३७६ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

मुंबई- बॉलीवूडच्या कास्टिंग डिरेक्टरवर वेब सिरीजमध्ये काम करणा-या एका अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. वेब सिरीजमध्ये काम करणा-या एका अभिनेत्रीने बॉलीवूडचे कास्टिंग डिरेक्टर आयुष तिवारी यांच्या विरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी वेब सिरीज आणि सिनेमात काम करणा-या या अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार आयपीसी कलम ३७६ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी पिडित अभिनेत्रीच्या तक्रारीवर केस दाखल करण्यात आली. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत. 

हे ही वाचा: जुन्या सिनेमाला नवीन तडका देणार सारा-वरुण, कुली नंबर वनचा ट्रेलर रिलीज  

कास्टिंग डिरेक्टवर केला बलात्काराचा आरोपवर्सोवा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिका-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ''पिडित अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार, आरोपीने अभिनेत्रीला लग्नाचं वचन देत अनेकदा तिच्यावर बलात्कार केला अशी मोठी बातमी आता इंडस्ट्रीतून समोर येत आहे. मात्र अजुन या प्रकरणाचा तपास सुरु आहे.'' 

देशात बलात्काराची प्रकरणं काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. दर दिवशी कुठुनतरी अशी प्रकरणं समोर येत आहेत जे माणुसकीची हद्द पार करतायेत. या प्रकरणाच्या बाबतीत तपास सुरु असल्याने अधिक माहित लवकरंच समोर येईल. सध्या तरी यात कोणाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.   

tv actress rape by casting director case registered mumbai police  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tv actress rape by casting director case registered mumbai police