रणवीर सिंगला होऊ शकते अटक,शाहरुखची भविष्यवाणी; काय आहे प्रकरण? Ranveer Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

When Shah Rukh Khan predicted Ranveer Singh would get arrested

रणवीर सिंगला होऊ शकते अटक,शाहरुखची भविष्यवाणी; काय आहे प्रकरण?

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे(Nude Photshoot) वादात(Controversy) सापडला आहे. प्रत्येक ठिकाणी चर्चा होतेय की हे रणवीरनं बरोबर केलं की चूक. काही लोक त्याच्या पाठीशी उभे राहिलेयत तर कही त्याची सडकून टिका करत आहेत. इतकंच नाही तर महिलांच्या भावनांचा सम्मान राखला नाही असं म्हणत त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. बोललं जात आहे की ज्या अॅक्ट अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे त्याला सात वर्षांची सजा देखील होऊ शकते. पण या दरम्यानच आता एक नवीन बातमी समोर येत आहे की म्हणे शाहरुखनं(Shahrukh Khan) भविष्यवाणी केलेली रणवीरच्या या अटकेची. काय आहे नेमकं हे प्रकरण? चला,जाणून घेऊया.(When Shah Rukh Khan predicted Ranveer Singh would get arrested)

हेही वाचा: R Madhavan आणि बिपाशा बासू प्रकरण माहितीय? अभिनेत्यानं स्वतः केलं होतं कबूल

आता शाहरुखनं रणवीरला होणाऱ्या अटकेची सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी केलेली हे ऐकून आश्चर्य वाटणं साहजिक आहे. पण शाहरुख म्हणे तेव्हा म्हणाला होता की, कपडे घातल्यामुळे किंवा न घातल्यामुळे देखील रणवीरला जेल होऊ शकते. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे दिग्दर्शक-निर्माता करण जोहर हा फिल्ममेकर असण्यासोबतच कॉफी विथ करण शो चा होस्ट देखील आहे. हा शो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि यामध्ये सेलिब्रिटींच्या रिलेशनशीपवरनं,ब्रेकअपवरनं अनेक धक्कादायक खुलासे झालेले आपण सर्वांनीच ऐकले,वाचले असतील. शाहरुख जेव्हा शोच्या पाचव्या सिझनमध्ये म्हणजे २०१६ साली आला होता,तेव्हा त्यानं रणवीर सिंग संदर्भात एक भविष्यवाणी केली होती,जी आता खरी ठरू शकते.

शाहरुखने करण जोहरच्या त्या पाचव्या सिझनच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं,रणवीर सिंग कपडे घालण्यामुळे किंवा न घालण्यामुळे देखील जेलमध्ये जाऊन शकतो. रणवीर आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याचे कपडे नेहमीच चाहत्यांना शॉक देणारे असतात. अनेकदा त्यावरनं त्याची खिल्ली देखील उडवली जाते. पण ज्या आत्मविश्वासानं तो ते कपडे घालतो,त्याला दाद मात्र द्यावी लागेल. शाहरुख जेव्हा रणवीरविषयी बोलला होता त्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट देखील आली होती.

हेही वाचा: Ananya Pandey आणि विजय देवरकोंडाचा मुंबईच्या लोकलमधून प्रवास, Video Viral

कॉफी विथ करण ५ मध्ये जेव्हा करण जोहरने शाहरुखला विचारलं होतं की,त्याने कधी ऐकलं की रणवीर सिंगला अटक झाली? त्यावर शाहरुख हसत-हसत म्हणाला होता, रणवीरने कपडे घातले किंवा घातले नाही तरी त्याला अटक होऊ शकते. ही क्लीप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: When Shah Rukh Khan Predicted Ranveer Singh Would Get Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top