esakal | 'राजला अभिनेता म्हणून लाँच नाही करणार', शिल्पाने केलं होतं स्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

shilpa shetty, raj kundra

'राजला अभिनेता म्हणून लाँच नाही करणार', शिल्पाने केलं होतं स्पष्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

पती राज कुंद्राला अभिनेता म्हणून लाँच करणार नसल्याचं अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. २००९ मध्ये शिल्पा-राजने लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाला आता १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. राज सध्या अश्लील चित्रफितनिर्मिती प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. शिल्पा शेट्टीनं माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तिनं आपल्या विरोधात ज्या माध्यमांनी बदनामीकारक वार्तांकन केलं आहे त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. (When Shilpa Shetty said Raj Kundra was too pricey to be launched as an actor slv92)

२०१२ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीत पुनरागमन करण्याविषयी आणि निर्मिती क्षेत्राविषयी वक्तव्य केलं होतं. यावेळी पती राज कुंद्राला अभिनेता म्हणून लाँच करणार का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. शिल्पाने त्यास साफ नकार दिला होता. "राज हा माझ्यासाठी खूपच महागडा कलाकार ठरेल. माझ्या प्रॉडक्शन हाऊसला तो परवडणार नाही. तो घरीच स्टार आहे आणि त्यातूनच त्याला खूप लोकप्रियता मिळतेय."

२०१४ मध्ये एका पत्रकार परिषदेत राजला अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावेळी राज म्हणाला होता, "पहिली गोष्ट म्हणजे मला कोण बघणार? आणि दुसरं म्हणजे मी उद्योजक असल्याने कोणालाच परवडणार नाही."

हेही वाचा: 'झी मराठी'वरील तीन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत

राज कुंद्रा याने पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफिती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे ॲप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या ॲप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या ॲप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील ॲप्लिकेशनची माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली आहे. कुंद्रा व थॉर्प दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

loading image
go to top