esakal | सिद्धार्थने शहनाजच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास  
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थने शहनाजच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास  

सिद्धार्थने शहनाजच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla death) आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. गुरुवारी (२ सप्टेंबर) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले. अजूनही सिद्धार्थ आपल्यात नाही यावर कोणाला विश्वास बसत नाही. दरम्यान, आता सिद्धार्थने त्याची मैत्रीण शहनाज गिलच्या (Shehnaaz Gill) मांडीवर अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सिद्धार्थ बुधवारी रात्री ९.३० वाजता घरी परतला आणि त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं.

त्यावेळी सिद्धार्थची आई आणि शहनाज गिल घरी उपस्थित होते. शहनाज ही सिद्धार्थची मैत्रीण. बिग बॉसमध्ये ते एकत्र होते. सिद्धार्थच्या आईने आणि शहनाजने सिद्धार्थला लिंबू पाणी दिले आणि नंतर आईस्क्रीम खायला दिले, जेणेकरून त्याला थोडा आराम वाटेल. पण सिद्धार्थला बरं वाटलं नाही. त्याला पुन्हा छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटू लागलं. मग आईने आणि शहनाजने त्याला थोडा आराम करण्यास सांगितले. त्याला झोप लागत नव्हती म्हणून त्याने शहनाजला त्याच्या शेजारीच बसण्यास सांगितले. रात्री साधारण दीडच्या सुमारास सिद्धार्थ शहनाजच्या मांडीवरच झोपला आणि झोपेतच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: चीन आमचा सर्वात महत्त्वाचा सहकारी - तालिबान

शहजानला जेव्हा जाग आली तेव्हा त्याचे शरीर थंड पडल्याचे तिला जाणवले. लगेच तिने त्याच्या आईला बोलाविले. शहनाजचे वडील संतोख म्हणाले, की मुलीची रडून-रडून स्थिती वाईट आहे. शहनाज म्हणत होती की पप्पा, तो माझ्या हातात मरण पावला. मी आता कसे जगणार? त्याने हे जग माझ्या हातात सोडले.

हेही वाचा: ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह होणार सुरु, पण...

बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये बिंदू दारा सिंह होते. ते म्हणाले, की  "तो खूप तंदुरुस्त आणि देखणा होता. त्याच्या जाण्याने आपल्या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे" अभिनेत्री शेफाली जरीवाला म्हणाली, की "आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलो होतो आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त होता. तो खूप आनंदी दिसत होता. तो त्याच्या कामाबद्दल खूप आनंदी होता. मलाखूप धक्का बसला आहे"

loading image
go to top