'चला आता सफाई करण्याची आली वेळ'; अभिनेत्री रविना टंडनच्या बोलन्याचा ओघ कोणाकडे?

युगंधर ताजणे
Wednesday, 23 September 2020

अभिनेञी रविना टंडन हिने चला आता सफाई करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई  -  ड्रग्स घेणा-यांच्या यादीत सारा अली खान, श्रध्दा कपुर नंतर दीपिका पदुकोनचे नाव आले आहे. तिला आता अंमली पदार्थ विभागाकडुन चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. यावर अभिनेञी रविना टंडन हिने चला आता सफाई करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिने दिलेल्या अशा खोचक प्रतिक्रियेमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 

अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, जर अनुराग कश्यप दोषी आढळून आला तर मी.. - 

  एनसीबीच्या तपासातुन वेगवेगळ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. यासगळ्यात रविनाने जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळायला हवी असे म्हटले आहे. दररोज नवनवीन कलाकारांची नावे ड्रग्ज कनेक्शन मध्ये येत असल्याने हिंदी चिञपट सृष्टीत अस्वस्थता पसरली आहे. यासगळ्या परिस्थिबाबत रविना म्हणते, आता सफाई करण्याची वेळ आली आहे. यानिमित्ताने आपल्या पुढील पिढीची आपल्याला घेता येईल. ड्रग्ज घेणारे, त्याचा सप्लाय करणारे आणि त्याचे वितरण करणारे यासगळ्यांवर कठोर कारवाई प्रशासनाने करावी. मोठे लोक आपल्या फायद्यासाठी अशाप्रकारचे धंदे करताना दिसत आहे. रवीनाने जाहीर केलेल्या पोस्टच्या माध्यमातुन तटस्थ भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, अग्गंबाई सासुबाईच्या शूटींगला ब्रेक - 

सुशांतसिंग आत्महत्या घटनेनंतर त्याच्या तपासातुन विविध गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातील ड्रग्ज प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले आहे. विशेष म्हणजे जया बच्चन, तापसी पन्नु, अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, मनोज वाजपेयी यांच्यासह अनेकांनी ड्रग्जच्या मुद्यांवर बोलताना सांगितले की, सगळेजण ड्रग्ज घेत नाहीत. तर निम्याहुन अधिक ड्रग्जच्या नशेत असल्याचे काहींचे म्हणणे होते.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To whom does actress Raveena Tandon speak