Fighter Deepika Padukon: 'फायटर'च्या इव्हेंटला दीपिका राहणार गैरहजर, चिंताजनक कारण समोर

'फायटर'च्या ट्रेलर लॉंचला दीपिका पादुकोण गैरहजर राहिली आहे
why deepika padukon not attend fighter trailer launch event mumbai bandra
why deepika padukon not attend fighter trailer launch event mumbai bandra SAKAL

Fighter Deepika Padukon: 'फायटर'चा ट्रेलर रिलीज झालाय. मुंबईत जिओ प्लाझा येथे फायटरचा ट्रेलर लॉंच झालाय. या इव्हेंटला सिनेमाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि फायटरची संपूर्ण टीम उपस्थित होती.

फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. भव्यदिव्य पद्धतीने हा मुंबईत हा ट्रेलर लॉंच करण्यात आला. पण या ट्रेलर लॉंचला दीपिका पादुकोण मात्र गैरहजर होती. त्यामागचं चिंताजनक कारण समोर आलंय.

(why deepika padukon not attend fighter trailer launch event mumbai bandra)

म्हणून दीपिका फायटरच्या ट्रेलरला गैरहजर

'फायटर'चा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी टीम फायटरला शुभेच्छा देण्यासाठी दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये खास पोस्ट केली. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं की ती आजारी असल्याने ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.

दीपिकाने लिहिले, 'माझ्या स्क्वाड्रनला मिस करेल.' असं म्हणत दीपिकाने सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या

फायटरचा ट्रेलर भेटीला

'फायटर'चा ट्रेलर आज भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये वायूसेनेचा थरार बघायला मिळतोय. पाकिस्तानने इंडियन एअर फोर्सवर आक्रमण केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारतीय वायु सेनेचे अधिकारी सज्ज आहेत. आणि मग भारतीय वायु सेना पाकिस्तानला कसा जवाब देणार, अशा कहाणीची झलक फायटरच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळतेय. 'फायटर' चा ट्रेलर पाहून अंगावर रोमांच उभे राहतात.

फायटरची रिलीज डेट

फायटर सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २५ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाण सिनेमा २०२३ ला प्रजासत्ताक दिनाला रिलीज झाला होता. पठाणने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. त्यामुळे आता सिद्धार्थचा फायटर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com