esakal | मग त्यावेळी मुकेश खन्ना यांनी महाभारत का नाही सोडले ?; गजेंद्र चौहान यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Why did not you leave Mahabharat when Arjun dressed as a woman

कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले. त्या शो वरुन ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियातून कपिलच्या शो वर सडकून टीका केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. अभिनेते गजेंद्र चौहान आणि मुकेश खन्ना यांच्यात ''महाभारत'' सुरु झाले आहे.

मग त्यावेळी मुकेश खन्ना यांनी महाभारत का नाही सोडले ?; गजेंद्र चौहान यांचा सवाल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोनी वाहिनीवर सुरु असणा-या महाभारत मालिकेतील सर्व कलाकार कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले. त्या शो वरुन ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियातून कपिलच्या शो वर सडकून टीका केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. अभिनेते गजेंद्र चौहान आणि मुकेश खन्ना यांच्यात ''महाभारत'' सुरु झाले आहे.

कपिल शो हा लोकप्रिय आहे मात्र मला हा कार्यक्रम बकवास वाटतो. त्याच्या इतका वाईट शो दुसरा नाही. अश्लील विनोदांनी भरलेला असा हा कार्यक्रम आहे ज्यात पुरुष स्त्रियांचे कपडे घालून नको ते अंगविक्षेप करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आणि विशेष म्हणजे यावर प्रेक्षक पोट धरुन हसत सुटतात. अशी शेलकी टीका मुकेश खन्ना यांनी केली. यावरुन नाराज झालेल्या चौहान यांनीही खन्ना यांना जशात तसे उत्तर दिले आहे.  कपिलच्या शो मध्ये जर पुरुष स्त्रियांचे कपडे घालून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतील तर मग महाभारतात अर्जुन ज्यावेळी स्त्री वेशभुषेत होता तेव्हाच मुकेश खन्ना यांनी तो कार्यक्रम का नाही सोडला ? असा सवाल चौहान यांनी उपस्थित केला आहे.

'इश्कबाज' फेम अभिनेत्री नीती टेलरने केलं गुपचुप लग्न

लोकप्रिय अशा महाभारत मालिकेत ‘भीष्म पितामह’ म्हणून  मुकेश खन्ना तर युधिष्ठिरच्या भुमिकेत गजेंद्र चौहान यांनी काम केले आहे. कपिलच्या कार्यक्रमामध्ये नीतीश भारद्वाज (श्रीकृष्ण), गजेंद्र चौहान (युधिष्ठिर), फिरोज़ खान (अर्जुन), पुनीत इस्सर ( दुर्योधन), गूफी पटेल (शकुनि) सहभागी झाले होते. सोनी टीव्हीवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणारा  ‘द कपिल शर्मा’ त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिध्द आहे. एका खास शो मध्ये महाभारत या मालिकेचे ५ कलाकार या मालिकेत सहभागी झाले होते.या कार्यक्रमाला इतर सर्व कलाकार आले असताना मुकेश खन्ना गैरहजर होते. यावर त्यांना त्यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न सोशल माध्यमांतून विचारला गेला होता.

अक्षय कुमार मुंबईत 'या' दिवशी सुरु करणार आगामी सिनेमाचं शूटींग

मुकेश खन्ना यांच्या टीकेला उत्तर देताना चौहान म्हणाले, खन्ना यांना आता द्राक्षे आंबट लागत आहेत. कारण त्यांनी ती द्राक्षे खाल्ली नाहीत. जे करोडो लोक कपिलचा शो पाहत आहेत त्या शो ला खन्ना वाह्यात म्हणत आहेत. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खन्ना अशाप्रकारचे प्रत्युत्तर दिले आहे.