why do dia mirza has muslim surname mirza
why do dia mirza has muslim surname mirzasakal

Dia Mirza Birthday: आई बंगाली, वडील जर्मन मग दियाचे आडनाव मिर्झा कसे? खास बात!

मुस्लिम नसूनही इस्लाम धर्माचे पालन करते दिया मिर्झा..

Dia Mirza: अभिनेत्री दिया मिर्झा हे नाव आता जारी चर्चेत नसलं किंवा चित्रपटातून झळकत नसलं तरी एक काळ असा होता की तेव्हा दियाची फक्त जादूच नव्हती तर दियासाठी लोक अक्षरशः वेडे होते. अशा दियाचा आज 42 वा वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी काही खास बात..

(why do dia mirza has muslim surname mirza)

why do dia mirza has muslim surname mirza
Kedar Shinde: सावध राहा! केदार शिंदे यांचे फेसबूक अकाऊंट हॅक..

दिया आज ४१ वर्षांची झाली तरी तिचे सौन्दर्य आजही तसेच आहे. किंबहुना आजही तिचे लाखों चाहते रोज तिला फॉलो करत असतात. पण दिया मुसलमान नसूनही तिचे नाव मिर्झा कसे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण त्यामागे एक मोठे कारण आहे..

दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत. तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच ही जर्मन वंशांचे आहेत. ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियाला घेऊन तिची आई विभक्त झाली. पुढे दियाच्या आईने हैदराबादचे अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्न केले. पण अहमद मिर्झा यांनी केवळ दियाच्या आईला स्वीकारले नाही, तर दियाला मुलगी म्हणून दत्तक घेतले. म्हणूनच दियाचे आडनाव मिर्झा असे आहे.

त्यामुळे दियाचे सर्व शिक्षण हैदराबादमध्ये झाले आहे. कॉलेजमध्ये असतानाच तिने स्वतःच्या पायावर उभं राहायला सुरुवात केली. सुरुवातीला ती एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होती. यादरम्यान तिनं लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम, इमामी आणि इतर कंपन्यांसह सर्व मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली. दिया मिर्झाने 2000 साली फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ती सेकंड रनर अप ठरली. 2000 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी दियाने मिस आशिया पॅसिफिकचा किताब पटकावला आणि तिचे नशीबच पालटले. त्यानंतर बॉलीवुडमध्ये येऊन दियाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com