'नगमा स्टँड विथ पाकिस्तान' चर्चेत का? 

वृत्तसंस्था
Thursday, 7 May 2020

राजकारणात सक्रीय असलेल्या नगमा  सोशल मीडियावर चर्चेत आहेत.एका पाकिस्तानी महिला पत्रकाराची बाजू घेत भाजपच्या प्रवक्त्यावर घणाघात केल्यामुळे ट्विटरवर तिला ट्रोल करण्यात येत आहे.

मुंबई -  हिंदी चित्रपटसृष्टीतील अदाकारीनंतर सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या नगमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत (ट्रेंडिंग) आहेत. सोशल मीडियावरील लोकप्रिय ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाल्यानंतर त्यांना पाकिस्तानी समर्थक म्हणून हिणवणे सुरु झाले आहे. एका पाकिस्तानी महिला पत्रकाराची बाजू घेत भाजपच्या प्रवक्त्यावर घणाघात केल्यामुळे ट्विटरवर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका हिंदी वृत्त वाहिनीच्या चर्चेत सहभागी झालेल्या पाकिस्तानी पत्रकार आणि या कार्यक्रमात सहभागी भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांच्यात शाब्दिक चकम झाली. यावेळी संबित पात्रांनी पाकिस्तानी महिला पत्रकाराला उद्देशून असभ्य भाषा वापरली यासंदर्भात नगमा यांनी ट्विटरवरुन आपल्या मनातील भावना व्यक्त केली. त्यानंतर ट्विटरवर  #NagmaStandsWithPakistan ट्रेंड पाहायला मिळत आहे. नगमा पाकिस्तानची बाजू घेत आहे, अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटताना दिसत आहेत.  

नगमा यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, भाजप प्रवक्त्याने 'आजतक' या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रातील  कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकार तरिक पीरजादा यांच्याविषयी वापरलेली भाषा योग्य नव्हती, अशा आशयाचे ट्विट नगमा यांनी केले आहे. एवढेच नाही तर निवेदक अंजना हिला मेंशन करत तुम्ही पाकिस्तानी पत्रकाराचा अपमान करण्यासाठी कार्यक्रमात बोलावता का? असा प्रश्नही उपस्थितीत केला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नगमा यांना मिर्ची लागली, असे म्हणत पाकिस्तानी पत्रकारालाही नेटकरी ट्रोल करत आहेत. या सर्व प्रकारानंतर मिम्सच्या माध्यमातून नगमा यांना पाकिस्तानचे समर्थक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नगमा यांनी केलेले ट्विट त्यांचा खरा चेहरा समोर आणणारे आहे, अशा आशयाने नेटकरी नगमा यांना टोला लगावत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why is Nagma Stands With Pakistan' trending on Twitter