'बायकोसाठी त्याच्या कानफटात मारली,तिनं माझीच जिरवली'; विल - जेडाचा घटस्फोट? Will Smith | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Will & Jada Might Be Getting a Divorce After the Oscars Slap—& It Could Be One of the ‘Ugliest’ in Hollywood

'बायकोसाठी त्याच्या कानफटात मारली,तिनं माझीच जिरवली'; विल - जेडाचा घटस्फोट?

हॉलीवूडमधनं(Hollywood) सध्या एक खळबळजनक वृत्त संमोर आलं आहे. आपल्या सगळ्यांना ऑस्कर(Oscar) मध्ये झालेलं थप्पड प्रकरण माहितच असेल. ख्रिस रॉकनं(Chris Rock) बायको जेडा पिंकेट (Jada Pinkett) चा अपमान केल्यामुळे विल स्मिथला सहन झालं नाही अन् त्यानं भर ऑस्कर सोहळ्यात मंचावर जाऊन सर्वांसमक्ष ख्रिसच्या कानशीलात लगावून दिली. सध्या हाती लागलेल्या माहितीनुसार कळतंय की,या थप्पड प्रकरणामुळे विल स्मिथचं वैयक्तिक आयुष्यही म्हणे संकटात आलं आहे.

हेही वाचा: 'बुरखा घाल,नमाज पढ';शाहरुखच्या घरात गौरीवर धर्म बदलण्याची झालेली जबरदस्ती?

अशी बातमी सध्या जोर धरून आहे की थप्पड प्रकरणामुळे सध्या विल आणि त्याची पत्नी जेडामध्ये सध्या जबरदस्त तणाव सुरु आहे. हॉलीवूडच्या गोटात सध्या या दोघांच्याच घटस्फोटावरनं चर्चा रंगलीय असं म्हणतात. ते दोघे म्हणे एकमेकांशी बोलतही नाही आहेत. दोघांमधला तणाव अधिक वाढल्याचं बोललं जात आहे आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.

हेही वाचा: बड्या हॉटेलात बंदी बनवून ठेवल्याचा गायक अंकित तिवारीचा खळबळजनक दावा

Heat मॅगझीननं दिलेल्या बातमीच्या आधारावर कळत आहे की,जेव्हापासून ऑस्करचं थप्पड प्रकरण घडलं आहे तेव्हापासून विल आणि जेडा मध्ये टेन्शन सुरु आहे. त्यांच्यामध्ये काही वर्षांपासून तणाव होताच पण आता प्रकरण एवढं वाढलंय की ते अगदी अभावानं एकमेकांशी बोलताना दिसतात. जर ते दोघे विभक्त होतील तर विल स्मिथला आर्थिक दृष्टया मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. विल स्मिथ ३५० मिलीयनचा मालक आहे,कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार अभिनेत्याला त्याच्या कमाईचा अर्धा हिस्सा पत्नी जेडाला द्यावा लागणार. बोललं जात आहे की हा घटस्फोट एंजेलीना जोली आणि ब्रॅड पीटच्या घटस्फोटापेक्षा अधिक जास्त वेळ चालेल.

हेही वाचा: रणबीर-कतरिना ब्रेकअपला जबाबदार होती आलियाच्या नात्यातली व्यक्ती,नाव ऐकाल तर

आता विल स्मिथ आणि जेडाच्या घटस्फोटाची बातमी किती खरी हे चाहत्यांना लवकर कळेलच. पण विलचे चाहते त्याच्या आयुष्यातील उलथापालथ पाहून नक्कीच चिंतेत पडले असतील. हे तर स्पष्ट झालं आहे की सेलिब्रिटी लोकांसमोर आपल्यातलं नातं किती छान आहे हे भले दाखवत असतील पण प्रत्यक्षात मात्र उलटच असतं. विल आणि जेडामधील तणाव हा खूप दिवसांपासून सुरू होता असं बोललं जात आहे.

Web Title: Will Jada Might Be Getting A Divorce After The Oscars Slap It Could Be One Of The Ugliest In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..