'जान बंगालीत बोलला तर चालेल का ?' जान कुमार सानुच्या आईचा प्रश्न   

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 29 October 2020

जानचे वडिल कुमार सानु यांना महाराष्ट्राकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. आता तर त्या शो मधील होस्ट सलमान खान यानेही आता फक्त हिंदी भाषेचा प्रयोग करावा असे स्पर्धकांना सांगितले आहे.

मुंबई - जान कुमारच्या मराठी भाषेच्या वक्तव्यामुळे काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण केलेल्या वक्तव्याने मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यास माफी मागत असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच ज्या कलर्स वाहिनीवरील बिग बॉस कार्यक्रमातून हा वाद समोर आला होता त्या मालिकेनेही आपला माफीनामा व्हायरल केला आहे. यासगळ्यात जान कुमार सानुच्या आईनेही आपली भावना व्यक्त केली आहे. 'आम्ही महाराष्ट्राचा अपमान कसा करु' असे म्हणून तिने आपल्या मुलाच्या चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे.

बिग बॉसमध्ये चमकण्यापेक्षा त्यात केलेल्या वादांमुळे जान कुमार सानु अधिक चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्याला मनसेने सडेतोड उत्तरही दिले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या वक्तव्यावर जशास तसे उत्तरही मनसेने दिलं आहे. आता जान कुमार सानुच्या आईने रिचा भट्टाचार्य यांनी आपल्या मुलाने केलेली  चुक सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत  त्या म्हणाल्या, 'जान ज्या कार्यक्रमात सहभागी झाला आहे तो एक खेळ आहे. कुणी त्याचा स्वतच्या फायद्यासाठी वापर करु नये. जेव्हा जान, राहुल वैद्य आणि निकी हे एकत्र होते त्यावेळी जानला मराठीत संभाषण करण्यास अडचण जाणवू लागली. त्याला काय बोलणे चालले आहे हे समजत नव्हते. त्यामुळे त्याने त्या दोघांना मराठीत न बोलण्याची विनंती केली. त्याला असे वाटले की ते दोघेजण माझ्याबद्दल बोलत आहेत आणि ते त्याला समजत नव्हते. प्रेक्षकांनी त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करुन नित्कर्षाप्रत पोहचावे.' 

आम्ही महाराष्ट्राचा अपमान कसा काय करु, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. त्याला आता 30 ते 35 वर्षे होतील. आम्हाला महाराष्ट्राने खुप प्रेम आणि सन्मान दिला आहे. जानचे वडिल कुमार सानु यांना महाराष्ट्राकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. आता तर त्या शो मधील होस्ट सलमान खान यानेही आता फक्त हिंदी भाषेचा प्रयोग करावा असे स्पर्धकांना सांगितले आहे. ज्यावेळी जानवर नेपोटिझमचा आरोप होतो त्यावेळी बोलायला कुणी पुढे येत नाही. त्यावेळी बोलणारे लोकं कुठे जातात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मला परिचित आहेत. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होईल असे वक्तव्य आमच्याकडून होणार नाही.

जानने जर बंगाली भाषेत बोलायला सुरुवात केली तर चालेल का, त्यानेच काय प्रत्येकाने त्यांच्या भाषेत बोलल्यास काय होईल, त्यांनी तसं करावं का? त्याला जाऊ द्या. तो एक लहान मुलगा आहे. त्याला जास्त त्रास देऊ नका. आम्ही महाराष्ट्राला नेहमीच वंदन करतो असेही भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. 
  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will you appreciate if Jaan starts talking in Bengali