esakal | करिनानं केला बबडूचा फोटो शेअर; महिला दिनाचे साधले औचित्य

बोलून बातमी शोधा

karina kapoor khan}

जागतिक महिला दिनानिमित्ताने अनेक सेलिब्रिटींने आपल्या कुटुंबामधील महिलांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करिनाने तिच्या मुलासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करिनानं केला बबडूचा फोटो शेअर; महिला दिनाचे साधले औचित्य
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - जागतिक महिला दिनानिमित्ताने अनेक सेलिब्रिटींने आपल्या कुटुंबामधील महिलांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करिनाने तिच्या मुलासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 21 फेब्रुवारीला मुंबईमधील ब्रिच कॅंन्डी हॅस्पिटलमध्ये करिनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करिना आणि सैफ अली खानला तैमुर नंतर पुन्हा पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यावेळी अनेक सेलिब्रेटींनी करिना आणि सैफला शुभेच्छा दिल्या. 2019 ऑगस्टमध्ये  करिनाने दुसऱ्या बाळाची गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर करत म्हटले होते,'आम्ही खूप आनंदाने हे सांगू इच्छीतो की, आमच्या कुटुंबात एक नविन पाहूणा येणार आहे.'  

महिला दिना निमित्त करिनाने सोशल मीडियावर एक गोंडस फोटो शेअर केला आहे. हा फोटोमध्ये करिना आणि बाळाचा सेल्फी आहे. करिनाचे बाळ तिच्या कुशित झोपले आहे.'महिला करू शकतच नाही अशी कोणतीच गोष्ट नाही, माझ्या प्रियजनांना महिला दिनाच्या शुभेच्छा' असे कॅप्शन करिनाने या फोटोला दिले. करिनाच्या बाळाचा सोशल मीडियावरील हा पहिला फोटो आहे.

मनोरंजन क्षेत्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काही दिवसांपूर्वी करिना आणि सैफच्या घरी बाळाला भेटायला मलायका अरोरा आणि अर्जून कपूरने हजेरी लावली होती. डिलिव्हरीच्या आधी करिनाने आपला बेबी बंम्प फ्लोन्ट करत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.