esakal | 'परदेशी कंपन्यांना बोलवायचं, धमकावयाचं असं कसं चालेल'
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Bhagat

'परदेशी कंपन्यांना बोलवायचं, धमकावयाचं असं कसं चालेल'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय अर्थव्यवस्था वाढावी यासाठी देशातील वेगवेगळे तज्ञ आपली मतं मांडत असतात. दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्येही त्यावर चर्चा केली जाते. धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी अतिशय जवळचा संबंध असणा-या या अर्थसंकल्पातून अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्या कोरोनाच्या काळात देशाची आर्थिक व्यवस्था फारशी ठीक नसल्याचेही तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी तिजोरीवर बोजा वाढला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी यापूर्वी पंतप्रधानांनी परदेशी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूकीसाठी आवाहन केले होते. प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे दिसून आले आहे. (writer chetan bhagat tweet on indian foreign policy said you will lose their trust. And trust, once broken)

यासगळ्या प्रकरणावर प्रसिध्द लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता चेतन भगत (writer chetan bhagat tweet ) यानं व्टिट केलं आहे. चेतन भगत हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या पुस्तकांना असणारा वाचकवर्ग मोठा आहे. त्याची सोशल मीडियावरील एक प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आताही तो चर्चेत आला आहे ते त्याच्या वक्तव्यामुळे. त्यानं भारतात ज्या परदेशी कंपन्या येणार आहेत त्यांच्या मनात भारताविषयी भीती असल्याचे दिसून आले आहे.

चेतननं (chetan bhagat tweet ) आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, एकीकडे आपण भारतात परदेशी कंपन्या यायल्या हव्यात असे म्हणतो. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे समजून घ्यायला हवे. यावेळी चेतननं सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, जर तुम्ही परदेशी कंपन्यांना धमकावणार असला तर त्या भारतात कशाला येतील. त्यांना भारतात व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी त्या येत आहेत. मात्र त्यांना मिळणारा प्रतिसाद नकारात्मक आहे असे म्हणावे लागेल.

हेही वाचा: 'लग्नाला दोन वर्षे झालीत, सध्या एवढचं सांगेन'...

हेही वाचा: चित्रपटाचं वेड! अवलियाने आयफोनवर शूट केला 'पिच्चर'

त्या कंपन्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे हे विसरता कामा नये. त्या विश्वासाला तडा गेल्यास तो पुन्हा जोडणे अवघड आहे. असेही चेतननं यावेळी म्हटले आहे. तुम्ही त्यांना धडा शिकवू शकत नाही. अन्यथा आपल्या स्वबळावर उभे राहावे लागेल. असे चेतन आपल्या व्टिटमध्ये म्हणतो. यापूर्वी चेतन यांनी टाईंम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या एका स्तंभामध्ये भारतानं कोरोनाच्या काळात ज्या तीन मोठ्या चूका केल्या त्याविषयी आपले परखड मत व्यक्त केले होते.