
Yami Gautam: 'त्यांने माझी नजर चुकवून व्हिडिओ बनवला अन् नंतर..' यामीनं सांगितला तो अनुभव
अभिनेत्री आलिया भट्टच्या घरातील तिचा फोटो कोणीतरी काढला आणि नंतर तो व्हायरल झाला. याबर केवळ आलियाच नाही तर सर्वंच बॉलिवूड कलाकारांनी गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित करत तिला पाठिंबा दिला. या घटनेचा निषेध केला होता.
आता याच प्रकरणावर अभिनेत्री यामी गौतमनेही प्रतिक्रिया दिली आहे. यामीने तिचा एक अनुभव सांगितला की कशाप्रकारे तिच्या सोबतही असं घडलं होतं.
मीडियाशी बोलताना यामी गौतम म्हणाली, 'एका टिनेज् फॅनने एकदा तिच्या स्टाफला एका फोटोसाठी विनंती केली, त्यामुळे तिने होकार दिला. मात्र मुलाने तिच्या परवानगीशिवाय त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. यामी गौतम पुढे म्हणाली की हे खूप वाईट होतं.
यामी गौतम पुढे म्हणाली, ' त्याच्या त्या व्लॉग व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले होते. तिच्या व्हिडिओवर खूप सारे व्हूज आणि कमेंट मिळाल्याने तिला ते पुन्हा कोणाबरोबर तरी करण्यास प्रोत्साहन मिळेल.
यामी पुढे म्हणाली, 'लोक येत्या पिढीसाठी ही गोष्टी सामान्य करत आहेत. आपल्याला सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यात एक सीमा ठेवावी लागेल. हे असं करणे काही बरोबर नाही.
यामीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री अलीकडेच लॉस्टमध्ये दिसली. यामी येत्या काही दिवसांत अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीसोबत ओह माय गॉड 2 या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय यामी 'चोर निकल के भागा' या चित्रपटात दिसणार आहे.