Aditi Rao And Siddharth
Aditi Rao And SiddharthEsakal

कियारा नंतर आता Aditi Raoचा नंबर! Siddharthसोबत डान्स करत दिले लग्नाचे संकेत,व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या ताज या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर सध्या आदिती संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र आदिती व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असते. आदिती अनेक दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थला डेट करत असल्याची चर्चा आहे.

दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात येत. दोघेही एकत्र पोस्ट शेअर करत असतात. काही दिवसांपुर्वीच तिला तिच्या आणि सिद्धार्थच्या डेटिंगबद्दल प्रश्न विचारला. आदितीने या प्रकरणावर बोलणं टाळलं आणि ती तेथून निसटली.जरी दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नसलं तरी बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कपल्सपैकी ते एक आहेत.

Aditi Rao And Siddharth
Jessica Chastain: अवॉर्ड जिंकल्याच्या आंनदात भान विसरली अन् अभिनेत्री स्टेवरच पडली! व्हिडिओ व्हायरल

डेटिंगच्या अफवांनंतरही दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले गेले आहे. ते अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतानाही दिसतात. त्याचबरोबर ते सोबत पोस्टही शेअर करतात. अशातच आता पुन्हा त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Aditi Rao And Siddharth
Urfi Javed: उर्फीचं 'ते' उत्तर ऐकल्यानंतर कतरिनाही म्हणत असावी, 'ही बया तर..' व्हिडिओ व्हायरल

अदिती आणि सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर त्यांचा रील शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही 'Tum Tum' या ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे. यात सिद्धार्थ काळ्या रंगाच्या शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये तर अदिती शरारा सूटमध्ये दिसत आहे. त्याने या पोस्टचे कॅप्शन लिहिले - डान्स मंकी - द रील डील.

Aditi Rao And Siddharth
Kriti Sanon:शेवटी क्रितीनं सांगितलं तिच्या बॉयफ्रेंडचं नावं? प्रभास नव्हे तर..

त्याचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. त्या दोघांचे चाहतेही त्यांना कमेंट करत आहेत. एकानं लिहिलयं की, 'तुम्ही दोघेही लग्न करा', काहींनी लिहिलयं की, त्यांनी कोड वर्डमध्ये लग्नाचे संकेत दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com