
बनावट आयडी वापरुन व्हॅक्सिन घेतलं, अभिनेत्री सौम्यावर आरोप
मुंबई - भाभीजी घर पर है (bhabhiji ghar par hai) मध्ये अनीता भाभीजी (anita bhabhi) भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन (saumya todon) सध्या वादाच्या भोव-यात सापडली आहे. तिनं बनावट आयडी कार्ड तयार करुन व्हॅक्सिन घेतल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. मात्र सौम्यानं या आरोपाचे खंडन केले आहे. ठाणे नगर निगम व्दारे त्या ओळखपत्राची तपासणी करण्यात आली. त्यातून मोठी बातमी हाती आली आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सौम्यानं सांगितले आहे. (tv actress saumya tandon was accused of getting a vaccin fake id)
त्या आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन सौम्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार सौम्यावर असा आरोप करण्यात आला होता की, तिनं एका आरोग्यसेवकाच्या (health servant) नावाचं बनावट आयकार्ड (fake id card) तयार करुन घेतलं होतं. त्यानंतर तिनं ठाण्यामध्ये व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर असे समोर आले आहे की, ज्यांचे वय 45 पेक्षा कमी आहे अशा 21 लोकांचे देखील फेक आयडी कार्ड तयार करण्यात आले होते.
व्हॅक्सिनेशनसारख्या महत्वाच्या गोष्टीतही बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी कशाप्रकारे फसवणूक केली आहे याचा प्रत्यय यानिमित्तानं समोर आला आहे. सौम्यानं सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. मी कुठल्याही प्रकारचे बनावट आय डी कार्ड बनवलेले नाही.
हेही वाचा: नेटकऱ्यांनी मागितला बिकिनी फोटो; अभिनेत्रीने शेअर केला 'हा' Pic
हेही वाचा: अगोदर अश्लील कमेंट केली, नंतर थेट ताईच म्हणाला....
आपण कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. मात्र मी तो ठाण्यातून न घेता माझ्या घराजवळून घेतला आहे. काही माध्यमांनी माझी बातमी दिली आहे. मी त्यांना सांगु इच्छिते की, मी सर्व नियमांचे पालन करुन, माझ्या घराजवळच कोरोनाचे व्हॅक्सिन घेतले आहे.
Web Title: Tv Actress Saumya Tandon Was Accused Of Getting A Vaccin Fake
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..