Yashoda Trailer: यशोदाचा ट्रेलर पाहून उडेल थरकाप, अंगावर येईल काटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashoda Trailer

Yashoda Trailer: यशोदाचा ट्रेलर पाहून उडेल थरकाप, अंगावर येईल काटा!

Yashoda Movie Trailer: केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडमध्ये देखील समंथानं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भलेही ती मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनपासून लाईमलाईटमध्ये आली असेल मात्र त्यानंतर तिनं केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. तिच्या बहुचर्चित अशा यशोदाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला असून त्याचे कौतूक होत आहे.

सरोगसी यावर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मेडिकल फिल्डमधील एक मोठी साखळी कशाप्रकारे सरोगसी करुन त्या सेवाभावी कार्याला काळीमा फासत आहे. हे यशोदाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांना केला आहे. काही दिवसांपूर्वी यशोदाचा कन्नड, तमिळ अशा वेगवेगळ्या भाषांमधील ट्रेलर व्हायरल करण्यात आला होता.

काय आहे यशोदाची स्टोरी...?

समंथाच्या यशोदाच्या ट्रेलरनं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा होती. यशोदाच्या निमित्तानं मेडिकल फिल्डमधील काही अराजक गोष्टी या आपल्यासमोर येणार आहेत. सरोगसीचा एक महत्वाचा मुद्दा चित्रपटामध्ये चर्चेत आणला गेला आहे. यशोदाला त्या रुग्णालयामध्ये काय चालले आहे हे कळले आहे. त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. अंगावर काटे आणणाऱ्या या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan: 'BCCI ने मानधनाचा घेतलेला निर्णय म्हणजे...' किंग खानची मोठी प्रतिक्रिया

11 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित...

यशोदामध्ये एका वेगळ्या अंदाजात दिसलेल्या समंथाचा यशोदा हा येत्या नोव्हेंबर महिन्यातील 11 तारखेला होणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. कारण त्याच भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. याशिवाय हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देखील तो प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटामध्ये समंथाशिवाय उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, मधुरिमा आणि वरदलक्ष्मी यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा: Saif Ali Khan-Kareena: आमच्या पोरांना सोडा राव! सैफ वैतागला