Ruhaanika Dhawan: वयाच्या 15व्या वर्षी बालकलाकार झाली आलिशान घराची मालकीन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruhaanika Dhawan

Ruhaanika Dhawan: वयाच्या 15व्या वर्षी बालकलाकार झाली आलिशान घराची मालकीन..

'ये है मोहब्बतें' या टीव्ही शोमधील छोट्या रुही भल्लाची भूमिका साकारून घराघरात पोहचलेली बालकलाकार रुहानिका धवन हिने कमाल केली आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी रुहानिका धवनने स्वतःसाठी करोडोंचे आलिशान घर विकत घेतले आहे. (Yeh Hai Mohabbatein fame Child actress Ruhaanika Dhawan buys a lavish house at the age of 15)

रुहानिका धवनने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. यासोबत तिने नवीन घराचे फोटोही शेअर केले आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नवीन घराचा फोटो शेअर करत एक नोट लिहिली आहे.

हेही वाचा: Tunisha Sharma Death Case: "शिझानही आत्महत्या करु शकतो", वकिलाच्या दाव्याने खळबळ

रुहानिका धवनने लिहिले आहे की, "वाहेगुरुजी आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद, मी माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करत आहे. एक नवीन सुरुवात. माझं हृदय आनंद आणि प्रेमानं भरलं आहे आणि मी अत्यंत आभारी आहे."

हेही वाचा: Shahrukh Khanची ऑन स्क्रिन मुलगी अंजलीचा साखरपुडा दणक्यात..

पुढे ती म्हणते, "माझे एक स्वप्न मी पूर्ण केले आहे. मी स्वतःचे घर घेतले आहे. हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे. म्हणूनच मला ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचे होते. मला मिळालेल्या सर्व प्लॅटफॉर्म आणि संधींसाठी मी आणि माझे पालक आभारी आहोत आणि त्यांच्यामुळेच मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले."

हेही वाचा: Bigg Boss 16: एमसी स्टॅनसाठी काहीपण! बिग बॉसच्या घरातच लाइव कॉन्सर्ट दणक्यात..

"मी आधीपासूनच एक मोठं स्वप्न पाहणारी आहे. मी अजून मेहनत करेन आणि माझी स्वप्ने पूर्ण करेन. जर मी माझी स्वप्ने सत्यात उतरवू शकते तर तुम्हीही करू शकतात. त्यामुळेच स्वप्ने पहा आणि त्यांचा पाठलाग करा. ते एक दिवस नक्कीच पूर्ण होतील." रुहानिका धवनच्या या घराची किंमत अद्याप समोर आलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार त्याची किंमत करोडोंमध्ये असल्याचं बोललं जात आहे.