vaishali thakkar : ससुराल सिमर का फेम अभिनेत्रीची आत्महत्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaishali thakkar

Vaishali Thakkar : ससुराल सिमर का फेम अभिनेत्रीची आत्महत्या...

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ती इंदूर येथील घरी राहत होती. वैशालीच्या आत्महत्येची माहिती कळताच पोलीसांनी  घटनास्थळी धाव घेतली असून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत्यूपूर्वी वैशालीने सुसाईड नोटही लिहिलेली आहे.

हेही वाचा: Karan johar video: ‘तू एवढा खराब का गातो’? करणच्या मुलांनीच घेतली त्याची शाळा!

वैशाली ठक्कर ही गेल्या 1 वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. तेजाजी नगर पोलिस स्थानकाअंतर्गत या प्रकरणाचा सुरु आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस तपास करीत असतांना घटनास्थळावरून पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. तिच्या सुसाईड नोटमधून काय माहिती समोर येते हे लवकरच कळेल. मात्र तिच्या आत्महत्येने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि तिच्या अचानक जाण्याने टिव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Tv actress : हिनाने केला देसी लूकमध्ये कहर....

 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधून वैशालीने करिअरला सुरुवात केली.यानंतर वैशाली 'ये है आशिकी' शोमध्येही लोकप्रियता मिळवली होती. तिला खरी ओळख ‘ससुराल सिमर का शो मधील अंजली भारद्वाज या भूमिकेतून मिळाली. याशिवाय वैशालीने ‘सुपर सिस्टर’, ‘मनमोहिनी सीझन 2’ मध्येही तिचा अभिनय नावाजला गेला.दंगल वाहिनीवरिल ‘रक्षाबंधन’ ही तिची शेवटची मालिका ठरली.

वैशालीने डॉ. अभिनंदन सिंह यांच्याशी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एंगेजमेंट केली होती. मात्र, एंगेजमेंटच्या एक महिन्यानंतरच वैशालीची एंगेजमेंट मोडली. एंगेजमेंट मोडल्यानंतर वैशालीने तिच्या रोका सेरेमनीचा व्हिडिओही सोशल मीडिया हँडलवरून डिलीट केला होता.