Karan johar video: ‘तू एवढा खराब का गातो’? करणच्या मुलांनीच घेतली त्याची शाळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan johare

Karan johar video: ‘तू एवढा खराब का गातो’? करणच्या मुलांनीच घेतली त्याची शाळा!

करण जोहर हा बॉलिवुडमध्ये नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करवा लागतो. त्याची एक चुक आणि तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मग तो त्याचा चित्रपट असो किंवा त्याचा ‘कॉफि विथ करण’ हा शो. या शोला जेवढी लोकप्रियता मिळते,तेवढाच तो त्याच्या उलट सूलट प्रश्नामूळे ट्रोल केला जातो. मात्र तो यावेळी कुण्या बाहेरील व्यक्तीने त्याला काही बोलले नाही तर त्याच्या मूलांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

करण त्याच्या मुलांसोबत वेळ घालवतांना दिसतो. त्याचे व्हिडिओदेखिल तो पोस्ट करत असतो.असाच एक व्हिडिओ त्याने शनिवारी इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात तो त्याच्या दोघा मुलांसोबतच्या वीकेंडची मजा घेतांना दिसतोय.

यश आणि रुही खेळत असतांना यश काहितरी बोलतो आणि करणने त्याला विचारतो, 'काय बोलत होतास? तेव्हा यश म्हणतो,'मी तुला टीव्हीवर पाहिले. तू एवढं  खराब का गात होतास?’ करणने विचारलं, ‘मी काय खराब करतोय?’  तेव्हा दोघेही उत्तर दिलं, ‘तू वाईट गात होतास.' यावर करण जोहर म्हणतो, 'मी खूप छान गातो. माझा आवाज अप्रतिम आहे, पण मी सुंदर गातो. तुम्हाला माझे गाणे ऐकायचे आहे का?' दोन्ही मुलं द्विधा मनस्थितीत “हो” म्हणतात  त्यानंतर करण 'अभी ना जाओ छोड कर' हे गाण्यास  सुरूवात करतो. त्याचे गाणे एकल्यानतंर त्यांच्या दोघा मुलांनी कानावर हात ठेवले. करण त्यांना म्हणातो, 'अरे ऐका ना.' ते खूप हसतात.

हेही वाचा: Hema Malini Birthday: ड्रीम गर्लचे हे सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

व्हिडिओ शेअर करताना करणने या व्हिडिओला 'माझ्या घरात माझ्या मधुर  आवाजाचा कोणीही चाहता नाही.' असं कॅप्शन दिलंय. यावर त्याला भरभरुन कमेंट आल्या आहेत.'करण जोहर सर तुम्हाला गाण्याचे क्लास लावण्याची गरज आहे.' तर दुसऱ्या चाहत्याने पोस्टवर लिहिले, ‘करणच्या मुलांनीच त्याला रोस्ट केले.’ तर एक म्हणतो, ‘घर की मुर्गी दाल बराबर असते सर.’