
Shivangi Joshi: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल; फोटो शेअर करत म्हणाली...
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील नायरा उर्फ शिवांगी जोशीच्या चाहत्यांची कमतरता नाही. शिवांगीवर तिचे चाहते खूप प्रेम करतात, परंतु आजकाल अभिनेत्रीच्या तब्येतीचे अपडेट जाणून लोक दुःखी आहेत.
शिवांगीने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या आरोग्यासंबंधी माहिती शेअर करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. ती लवकर बरी व्हावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
शिवांगी जोशीला किडनीचे इन्फेक्शन झाले हे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टद्वारे तिच्या आरोग्याची माहिती दिली आहे. फोटोमध्ये शिवांगी ओके असे म्हणत तिच्या तब्येतीची सूचना देत आहे. शिवांगी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून हसताना दिसत आहे.
शिवांगीने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेले काही दिवस जरा कठीण गेले आहेत. मला किडनी इन्फेक्शन झाले आहे. पण माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी माझ्यासोबत आहेत. माझी रुग्णालयात खूप चांगली काळजी घेतली जात आहे.
सध्या मला बरं वाटत आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या शरीराची, आरोग्याची काळजी घ्या. पाण्याची शरीरात कमी होऊ देऊ नका. लवकरच मी पुन्हा जोमाने कामाला लागेन. सध्या तब्येतीत बरीच सुधारणा आहे.’
'ये रिश्ता'नंतर 'बालिका वधू 2' आणि 'खतरों के खिलाडी 12'मध्ये दिसलेली शिवांगी जोशी 'बेकाबू'मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तिच्यासोबत ईशा सिंग, शालिन भानोत आणि मोनालिसा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा शो कलर्सवर 18 मार्च 2023 रोजी प्रसारित होईल.