esakal | 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतल्या 'त्या' दृश्यावर प्रेक्षक भडकले; सोशल मीडियावर होतेय टीका
sakal

बोलून बातमी शोधा

yeu kashi tashi mi nandayla

अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतल्या 'त्या' दृश्यावर प्रेक्षक भडकले; सोशल मीडियावर होतेय टीका

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका जानेवारी महिन्यात सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेतल्या स्वीटू आणि ओमकार या दोन पात्रांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. मात्र ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यामागचं कारण म्हणजे नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात दाखवलेलं एक दृश्य. या वादग्रस्त दृश्यावर प्रेक्षक संतापले असून सोशल मीडियावर टीका होत आहे. 

या मालिकेत खानविलकर कुटुंबातील मोठी मुलगी मालविका हिला गर्भश्रीमंत असल्याचा खूप गर्व असतो. गरीबांना ही अत्यंत हिन दर्जाची वागणूक देताना दिसते. मालिकेतल्या एका दृश्यात ती घरातील सदस्य रॉकीला अत्यंत वाईट पद्धतीची शिक्षा देते. रॉकीच्या गळ्यात तिनं कुत्र्याचा पट्टा घालून त्याला कुत्र्याप्रमाणे वागण्याची शिक्षा दिल्याचं मालिकेत पाहायला मिळतं. हेच दृश्य प्रेक्षकांना खटकलं असून त्यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा : जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत धमाल डान्स; नेटकरी पडले प्रेमात

ही अत्यंत हीन दर्जाची वागणूक असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. तर महिलांवरील अत्याचाराबद्दल बोललं जातं, मात्र पुरुषाला दिलेली अशी वागणूक चालते का, असा सवालही प्रेक्षकांनी केला आहे. या मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ओमकारची भूमिका शाल्व तर स्वीटूची भूमिका अन्विता साकारत आहे. यामध्ये अदिती सारंगधर मालविका ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. 

loading image