'मखना', 'लोका'नंतर आता यो यो हनी सिंगचं 'हे' नवं गाणं ठरतंय हिट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

यो यो ची गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणारी असतात. त्याने हिंदी चित्रपटांना दिलेली गाणीही प्रचंड गाजली. कुल रॅपर हनी आता आणखी नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मुंबई- प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंगची तरुणाईमध्ये खूप मोठी क्रेझ आहे. त्यांची रॅप साँग्जवर तरुणाई भलतीच फिदा आहे. कितीतरी हिट गाणी त्याने दिली आणि लोकांना आपल्या गाण्यावर नाचविले. मध्यंतरी तो गायब झाला होता आणि व्यसनाच्या अधीन गेला होता. त्यामुळे यो यो सिंग संपला अशी काहींनी ओरड केली. काही टीकाकारांनी त्याच्या गाण्यावरही तोंडसुख घेतले. परंतु रॅप गाण्याचे तरुणाईला खऱ्या अर्थी वेड लावले ते यो यो हनी सिंगने. त्याची गाणी, त्याचा डान्स आणि त्याची एकूणच वेशभूषा तरुणाईला भुरळ नेहमीच घालते. त्याने इंडस्ट्रीत जोरदार कमबॅक केले आणि पुन्हा आपल्यातील कलागुण दाखविले. आपल्या यशाची घोडदौड त्याने सुरूच ठेवली. तरुणाईमध्ये क्रेझ असते ती रॅपर-गायक यो यो हनी सिंगच्या गाण्यांची. यो यो ची गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणारी असतात. त्याने हिंदी चित्रपटांना दिलेली गाणीही प्रचंड गाजली. 

हे ही वाचा: हिंदी देखील सहज न बोलणारी सनी घेतेय मराठीचे धडे, सनीच्या तोंडून मराठी ऐकायचंय तर व्हिडिओ पहाच..

कुल रॅपर हनी आता आणखी नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टी-सीरिजच्या `मॉस्को सुका` हे गाणं आता युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये हनीला साथ दिली आहे ती गायिका नेहा कक्कडने.

नेहा आणि हनीने याआधीही 'मखना' हे गाणं एकत्रित केलं होतं. त्यांच्या या गाण्यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता या नव्या गाण्यातही दोघांचा एक वेगळा आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. हनी म्हणतो, 'याआधी माझी मखना, लोका ही गाणी युट्यूबवर प्रचंड गाजली. या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. शिवाय आताच्या परिस्थितीमध्ये हे गाणं प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करेल. नेहा-हनीच्या या नव्या गाण्याला अगदी कमी वेळात हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.  

yo yo honey singhs next chartbuster moscow suka featuring neha kakkar is out now  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yo yo honey singhs next chartbuster moscow suka featuring neha kakkar is out now