esakal | नेहा धुपियाकडे पुन्हा 'गुड न्यूज'! दुसऱ्यांदा होणार आई
sakal

बोलून बातमी शोधा

neha angad

नेहा धुपियाकडे पुन्हा 'गुड न्यूज'! दुसऱ्यांदा होणार आई

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री नेहा धुपिया Neha Dhupia दुसऱ्यांदा आई होणार असून गरोदर असल्याची गोड बातमी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. नेहा आणि तिचा पती अंगद बेदीने Angad Bedi खास फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी सांगितली. नेहा आणि अंगद यांना दोन वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव मेहेर असं आहे. सोशल मीडियावर मेहेरसोबतचा हा 'क्यूट फॅमिली फोटो' पोस्ट करत अंगदने लिहिलं, 'नवीन होम प्रॉडक्शन लवकरच..' या फोटोमध्ये नेहाचा बेबी बंप दिसून येत आहे. नेहा आणि अंगदने हा फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींनीसुद्धा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Neha Dhupia and Angad Bedi to welcome second baby shares good news with fans slv92)

नेहा आणि अंगदने २०१८ मध्ये गुपचूप लग्न केलं होतं. लग्नाआधीच नेहा गर्भवती असल्याने तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं नंतर स्पष्ट झालं. नोव्हेंबर २०१८ मध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. त्यावेळी गरोदर असल्याची बातमी सहा महिन्यांपर्यंत सर्वांपासून लपवून ठेवल्याचा खुलासा नेहाने एका मुलाखतीत केला होता. 'मी गरोदर असल्याचं कळताच मला कोणी काम देणार नाही. माझ्याबद्दल चुकीचं मत बनवतील अशी भीती मला सतत होती, म्हणूनच मी गरोदर असल्याचं कोणाला सांगितलं नव्हतं', असं तिने कबुल केलं होतं.

हेही वाचा: युट्यूब व्हिडिओत 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थ मृत घोषित; तक्रारीवर अजब उत्तर

हेही वाचा: 'तू मुलाला विकू शकत नाही'; तैमुरसाठी सैफवर भडकली करीना

नेहाने 'सिंग इज किंग', 'तुम्हारी सुलू', 'हिंदी मीडियम', 'लस्ट स्टोरीज' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर अंगदने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल', 'सूरमा', 'पिंक', 'डिअर जिंदगी', 'टायगर जिंदा है' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

loading image