esakal | राज कुंद्राने अश्लील व्हिडीओसाठी केला होता मेसेज; युट्यूबरचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

puneet kaur and raj kundra

राज कुंद्राने अश्लील व्हिडीओसाठी केला होता मेसेज; युट्यूबरचा खुलासा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अश्लील व्हिडीओसाठी राज कुंद्राने Raj Kundra डीएम (डायरेक्ट मेसेज) केल्याचा खुलासा युट्यूबर पुनीत कौरने Puneer Kaur केला आहे. अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर पुनीतने राजच्या मेसेजचा खुलासा केला. हॉटशॉट्स या अॅप्लिकेशनसाठी अश्लील व्हिडीओ करण्यासंदर्भात राजने मेसेज केला होता, असं ती म्हणाली. (YouTuber Puneet Kaur says Raj Kundra tried to lure her for Hotshots slv92)

'या व्यक्तीने मला डायरेक्ट मेसेज करून हॉटशॉट्सच्या व्हिडीओसाठी विचारणा केली होती. त्यावेळी मला तो स्पॅम मेसेज वाटला होता. राज कुंद्राचा अकाऊंट हॅक झाला असेल असं मला वाटलं होतं. मात्र आता त्याच व्यक्तीची तुरुंगात रवानगी झाली आहे', असं तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय. मेसेजचे काही स्क्रीनशॉट्ससुद्धा तिने पोस्ट केले आहेत.

हेही वाचा: "पॉर्न आणि बोल्ड व्हिडीओ यात फरक"; राज कुंद्राच्या अटकेवर गहना वशिष्ठची प्रतिक्रिया

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये गुन्हे शाखेने मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा घालून अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक केली होती. या गुन्ह्यात राज कुंद्रा मुख्य आरोपी असून, त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला. राज कुंद्रा याने पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे ॲप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या ॲप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या ॲप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील ॲप्लिकेशनची माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली आहे. कुंद्रा व थॉर्प दोघांनाही न्यायालायने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

loading image