esakal | युवराज, हर्षवर्धन, लिएंडरच नाही.. तर यांच्यासोबतही जोडलं गेलं किमचं नाव
sakal

बोलून बातमी शोधा

kim sharma relationships

युवराज, हर्षवर्धन, लिएंडरच नाही.. तर यांच्यासोबतही जोडलं गेलं किमचं नाव

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनय क्षेत्रातील करिअरपेक्षा अभिनेत्री किम शर्मा Kim Sharma ही तिच्या खासगी आयुष्यामुळेच अधिक चर्चेत राहिली. टेनिसपटू लिएंडर पेससोबतचे Leander Paes फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा किमच्या अफेअर्सची चर्चा होतेय. किमने कार्लोस मरिनशी साखरपुडा केला होता तर अली पंजाबीशी लग्न केलं होतं. क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेता हर्षवर्धन राणेशीही तिचं नाव जोडलं गेलं. आता किम आणि लिएंडर पेस एकमेकांना डेट करत असल्याचं समजतंय. किम शर्माचं कोणाकोणासोबत नाव जोडलं गेलं, ते पाहुयात.. (Yuvraj Singh Harshvardhan Rane Leander Paes Kim Sharma rumoured relationships slv92)

युवराज सिंग- युवराज आणि किम यांचे एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर किम-युवराजचा ब्रेकअप झाला. मात्र याबद्दल दोघं कधीच माध्यमांसमोर व्यक्त झाले नव्हते.

कार्लोस मरिन- युवराज सिंगशी ब्रेकअप केल्यानंतर स्पॅनिश गायक कार्लोस मरिनला किम डेट करू लागली होती. या दोघांनी साखरपुडासुद्धा केला होता. मात्र साखरपुड्यानंतर काही कारणास्तव दोघांचं ब्रेकअप झालं.

हेही वाचा: लिएंडर-किम शर्माच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धनची प्रतिक्रिया

अली पंजाबी- कार्लोसशी ब्रेकअप झाल्यानंतर किमने केन्यामधील भारतीय व्यावसायिक अली पंजाबीशी लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोम्बासामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. २०१७ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर किम भारतात परतली.

अर्जुन खन्ना- डिझायनर अर्जुन खन्नासोबतही किमचं नाव जोडलं गेलं होतं. विवाहित अर्जुन आणि किमचं नातं फार काळ टिकलं नाही. अवघ्या काही महिन्यांतच या दोघांचा ब्रेकअप झाला.

हर्षवर्धन राणे- अभिनेता हर्षवर्धन आणि किमचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका मुलाखतीत हर्षवर्धनने रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीसुद्धा दिली होती. मात्र अवघ्या वर्षभरातच दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.

लिएंडर पेस- किम शर्मा सध्या लिएंडर पेससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. या दोघांचे गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

loading image