हम पे थोड़ी दया तो करो हम नन्हे बालक है 

वृंदा चांदोरकर
मंगळवार, 17 जानेवारी 2017

दंगल चित्रपट हिट झाला आणि काही नवीन चेहऱ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्यातलेच एक नाव म्हणजे 'झायरा वासिम'. दंगल चित्रपटात 'धाकड' अशा छोट्या गीता फोगटचे काम करणाऱ्या झायराची भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांबरोबरच समिक्षकांचेही लक्ष या बालकलाकाराने वेधून घेतले. 

दंगल चित्रपट हिट झाला आणि काही नवीन चेहऱ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्यातलेच एक नाव म्हणजे 'झायरा वासिम'. दंगल चित्रपटात 'धाकड' अशा छोट्या गीता फोगटचे काम करणाऱ्या झायराची भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांबरोबरच समिक्षकांचेही लक्ष या बालकलाकाराने वेधून घेतले. 

झायरा वासिम हिने जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर काश्मीरमधील तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या. त्यामुळे सोळा वर्षे वयाची झायरा सध्या सोशल मिडियावरही चर्चेत आहे. काश्मिरमधील कट्टरतावाद्यांनी सोशल मीडियावरून धमक्या दिल्यानंतर झायराने सोशल मीडियावरच माफी मागितली. कट्टरतावाद्यांना 'युथ आयकॉन' म्हणून झायरा नको आहे, तर हातात दगड घेतलेले तरूण हवे आहेत. काश्मिरमधील कट्टरतावाद्यांच्या धमक्यांनंतर अवघा देश झायराच्या बाजूने उभा राहिला आहे. 

असे असले तरी तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. चित्रपटातील तिच्या हरियाणवी लहेजामुळे तर ती नक्की कुठली असा प्रश्न अनेकांना पडला. झायरा ही मुळ श्रीनगरमधील हवल (जम्मू- काश्मिर) येथील. सेंट पॉल सोनवर या मिशनरी शाळेत तिचे शिक्षण झाले. झायराच्या घरचे वातावरणही अगदी साधे असल्याचे ती सांगते. तिचे वडील बॅंकेत आहेत तर आई शाळेत शिक्षिका आहे.

चित्रपटात पदार्पण करण्याआधी झायराने काही जाहिरातींमध्ये भूमिका साकारल्या होत्या. परंतु, टीव्ही ते मोठा पडदा हा प्रवासही तिच्यासाठी सोपा नव्हता. तिच्या एका नातेवाईकांच्या सांगण्यावरुन झायरा मुंबईला चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आली. त्यावेळी तिला नेमके आपण कोणत्या चित्रपटासाठी ही ऑडिशन देत आहोत हे देखील माहित नव्हते. शिवाय ऑडिशन जवळजवळ सहा महिने चालली. शेवटी दहा हजार मुलींमध्ये दंगल चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी छोट्या गीतासाठी झायराची निवड केली.

चित्रपटासाठी निवड झाल्यानंतरही झायराला या भूमिकेसाठी चांगलेलच कष्ट घ्यावे लागले. हा प्रवास चांगलाच कठीण असल्याचे ती सांगते. कारण या भूमिकेसाठी तिला खास कुस्तीचे प्रशिक्षण घ्यावे लागले. ''माझी निवड झाली. पण या भूमिकेसाठी मी खूपच बारीक दिसत होते. त्यामुळे मी कुस्तिगीर दिसण्यासाठी मला माझ्या शरीरयष्टीवर चांगलेलच काम करावे लागले,'' झायरा सांगते.        

चित्रपटातील पदार्पण हा देखील एक योगायोगच असल्याचे ती सांगते. तिच्या घरच्यांची तिने अभिनयाच्या क्षेत्रात यावे यासाठी पसंती नव्हती. ''मला खरंतर अभिनयाची आवड नव्हती. मी कधी विचारही केला नव्हता की मी एखाद्या चित्रपटात काम करेन, हा खरंतर नशीबाचा भाग आहे,'' असं ती सांगते. 

दंगलच्या यशानंतर आमीरच्या अगामी 'सीक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात देखील झायरा असणार आहे. 

झायरा वासिम
जन्मः 23 ऑक्टोबर 2000
बालपण 
- हवल (श्रीनगर) येथे जन्म
- श्रीनगरमधील सेंट पॉल सोनवर मिशनरी शाळेत शिक्षण
- वडील बॅंकेत आहेत तर आई शाळेत शिक्षिका
शिक्षण
- झायराने नुरतिच दहावीची परिक्षा दिली आहे.
आगामी चित्रपट 
- 'सीक्रेट सुपरस्टार'

Web Title: zaira wasim dangal