esakal | बॉलिवूड सोडल्यानंतर 'दंगल गर्ल'चा पहिला फोटो आला समोर
sakal

बोलून बातमी शोधा

Zaira Wasim

बॉलिवूड सोडल्यानंतर 'दंगल गर्ल'चा पहिला फोटो आला समोर | Zaira Wasim

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आमिर खानच्या 'दंगल' Dangal या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी झायरा वसीम Zaira Wasim हिने २०१९ मध्ये अभिनयक्षेत्र सोडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने सोशल मीडियावर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. 'अभिनयक्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहकडे जाणाऱ्या मार्गापासून भरकटले होते', असं म्हणत तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. झायराच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला होता. बॉलिवूड सोडल्यानंतर सोशल मीडियावर ती विविध पोस्ट लिहित होती. मात्र तिने स्वत:चा फोटो कधीच पोस्ट केला नव्हता. ती कुठे आहे, कशी आहे हे कोणालाच फारसं माहित नव्हतं. आता दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच तिने फोटो पोस्ट केला आहे.

झायराने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती कॅमेराकडे पाठ करून उभी असल्याने तिचा चेहरा पहायला मिळत नाही. एका पुलावर उभी असल्याचा तिचा हा फोटो आहे. ' ऑक्टोबरमधील उबदार सूर्य', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. झायराच्या या फोटोला एक लाखहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

हेही वाचा: वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडे यांची कामगिरी

'दंगल' या चित्रपटात झायराने लहानपणीच्या कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक प्रभावित झाले होते. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. उत्कृष्ट अभिनयकौशल्य अंगी असताना अचानक तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला होता. 'दंगल' या चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनीसुद्धा तिच्या निर्णयाला धक्कादायक म्हटलं होतं. 'द स्काय इज पिंक' हा झायराचा बॉलिवूडमधील शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात तिने फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत काम केलं होतं.

loading image
go to top