
किचनमध्ये रंगणार क्रिकेटचा सामना, किचन कल्लाकारमध्ये 'या' क्रिकेटर्सची हजेरी..
झी मराठीवरील (zee marathi) ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या गाजत आहे. या कार्यक्रमात केवळ कलाकारच नाही तर विविध क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. विशेष म्हणजे राजकारणातील दिग्गज व्यक्तींनीही या कार्यक्रमात येऊन धमाल केली आहे. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजू या कार्यक्रमाने समोर आणल्या आहेत. जेवण बनवणे, खेळ खेळणे आणि पडद्यामागच्या गप्पांमधून थट्टा मस्करी करणे असा काहीसा बाज या कार्यक्रमाचा आहे. या मंचावर यंदा चक्क आपल्या भारतीय संघाचे क्रिकेटर आले आहेत.
हेही वाचा: Photo : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा साखरपुडा.. राणा अंजलीचे खास फोटो..
झी मराठीवरील किचन कल्लाकार (kitchen kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या आठवड्यात कलाकार नाही तर प्रेक्षकांचे लाडके क्रिकेटर्स या किचनमध्ये पाककलेच्या सामन्यात सहभागी होणार आहेत. विनोद कांबळी, सलील अंकोला आणि अमोल मुजुमदार (amol mujumdar) हे तीन दिग्गज क्रिकेटर्स या आठवड्यात किचन कलाकारमध्ये काहीतरी भन्नाट पदार्थ बनवताना दिसतील.
हेही वाचा: या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चा महाअंतिम सोहळा
महाराजांसाठी ते कोणता पदार्थ बनवणार याची उत्सुकता आहेच पण या खेळाडूंसोबत किचनमध्ये केलेली धमाल, मजा, मस्तीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या खेळाडूंसोबत खेळण्यात आलेले खेळही खूप मजेदार आहेत. यावेळी विनोद कांबळी (vinoad kambli) आणि सलील अंकोला (salil ankola) यांना ग्लोव्स घालून शेंगदाणे सोलण्याचं आव्हान देण्यात आलं. तसंच विनोद कांबळी यांनी डायलॉग बोलून आपल्या अभिनयाची झलक दाखवली. क्रिकेट मैदानावर पराक्रम गाजवणाऱ्या या खेळाडूंनी किचनमध्ये काय धुमाकूळ घातलाय हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Web Title: Zee Marathi Kitchen Kallakar Cricketer Special Episode
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..