
किचन कल्लाकार : या कलाकारांच्या मुलांनी उडवली धमाल, पदार्थ करताना..
झी मराठीवरील (zee marathi) ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या गाजत आहे. या कार्यक्रमात केवळ कलाकारच नाही तर विविध क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. विशेष म्हणजे राजकारणातील दिग्गज व्यक्तींनीही या कार्यक्रमात येऊन धमाल केली आहे. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजू या कार्यक्रमाने समोर आणल्या आहेत. जेवण बनवणे, खेळ खेळणे आणि पडद्यामागच्या गप्पांमधून थट्टा मस्करी करणे असा काहीसा बाज या कार्यक्रमाचा आहे. या मंचावर काही दिवसांपूर्वीच क्रिकेटर अनिल कुंबळे आले होते. प्रत्येक भागात असे नवे कल्लाकार येत असतात. यंदा मात्र काही खास पाहुणे या मंचावर आले आहेत.(kitchen kallkar)
लेखक आणि अभिनेता अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची मुलगी दुर्वा गुरु, नाळ चित्रपटातील चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे आणि गायक मंगेश बोरगावकर यांची चिमुकली मीरा बोरगावकर ही तीन अवली बाळं यंदाच्या भागात सहभागी होणार आहेत. ही बच्चेकंपनी असली तरी त्यांच्या गप्पा आणि त्यांनी केलेली धम्माल पाहून आपली झोप उडणार आहे.
चिमुकली मीरा तिच्या बाबांना चक्क आई त्यांची बनून त्याला धारेवर धरणार आहे. यावेळी मंगेश शाळकरी मुलगा मीरा त्याला शिस्त लावणारी आई होणार आहे. यावेळी अनेक रंगतदार खेळ खेळण्यात येणार आहेत तर दुर्वा आणि श्रीनिवासच्या गप्प्पानी ते सर्वांना भंडावून सोडणार आहेत. विशेष म्हणजे हे तिघे बाल कल्लाकार महाराज प्रशांत दामले यांना काय खाऊ घालणार आणि ते पदार्थ बनवताना काय गोंधळ उडणार हे पाहण्यासारखे आहे.