Zee Marathi New Serial, 'Daar Ughad Baye' actress Sania Chaudhary
Zee Marathi New Serial, 'Daar Ughad Baye' actress Sania Chaudhary Google

'महाराष्ट्रात अनेक गावांत अजूनही मुलींनी संबळ वाजवणं म्हणजे..',सानिया स्पष्टच बोलली

मालिकेतील भूमिकेसाठी सानिया चौधरीनं रितसर संबळ वादनाचं शिक्षण घेतलं आहे.

Zee Marathi Actress Sania Chaudhary: "दार उघड बये" हि नवीन मालिका १९ सप्टेंबर २०२२ पासून, सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच शिगेला पोहोचली असेल. ‘शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव’ अशी तगडी कलाकारांची फौज ही या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. वादळवाट नंतर बऱ्याच वर्षांनी शरद पोंक्षे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहेत.(Zee Marathi New Serial, 'Daar Ughad Baye' actress Sania Chaudhary)

Zee Marathi New Serial, 'Daar Ughad Baye' actress Sania Chaudhary
घर चालवणं कठीण झालं तेव्हा मनावर दगड ठेवून आशा भोसलेंनी घेतलेला मोठा निर्णय...

या मालिकेत ‘सानिया चौधरी’ मुख्य भूमिका साकारत आहे. नाटक, मालिकां मध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती एक उत्तम नृत्यांगना असून तिने या भूमिकेसाठी संबळ वादनाचे आवर्जून प्रशिक्षण घेतले.

Zee Marathi New Serial, 'Daar Ughad Baye' actress Sania Chaudhary
'त्यानंतर अबू सलेम शाहरुखला सारखे फोन करायचा, खंडणीसाठी नाही तर...' वाचा सविस्तर

या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल बोलताना सानिया म्हणाली, “ मी मुक्ता ही भूमिका साकारत असून घर सावरण्यासाठी घरूनच चालत आलेली संबळ वाजण्याची कला मी आत्मसात करते. अर्थार्जन करून संबळ वाजवण्याची परंपराही जोपासते. हे एक असं गाव आहे जिथे मुलीच्या हातात संबळ बघणं एक अपशकुन मानलं जातं. फक्त त्या गावात नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावांमध्ये अजूनही मुलींनी संबळ वाजवणं चांगलं मानलं जात नाही. अश्या गावात एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुष प्रधान संस्कृती ह्यांचा लढा या मालिकेत दिसून येणार आहे. तर प्रेक्षकांसाठी हि मालिका बघणं रोमांचक ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com