'देवमाणूस'ला जड जाणार इंस्न्पेक्टर जामकरचा पाहुणचार.. मालिका रंजक वळणावर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zee marathi devmanus serial

'देवमाणूस'ला जड जाणार इंस्न्पेक्टर जामकरचा पाहुणचार.. मालिका रंजक वळणावर..

दररोज नवे गूढ उलगडत जाणारी 'देवमाणूस' (devmanus) ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वानंतर प्रेक्षकांच्या मागणीने दुसरे पर्वही सुरु झाले. सध्या या पर्वाची बरीच चर्चा आहे. आता या मालिकेत एक नवे पात्र आले आहे, ते म्हणजे इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. हे पात्र यांनी मिलिंद शिंदे (milind shinde) यांनी साकारले असून त्यांच्या अभिनयावर चाहते फिदा झाले आहेत. सध्या मालिका रंजक वळणावर असून इन्स्पेक्टर जामकर देवमाणूस म्हणजे डॉ. अजितकुमारची चांगलीच कोंडी करणार आहे.

हेही वाचा: नुकतीच विवाहबंधनात अडकलेली ए आर रहमानची मुलगी आणि जावई आहे तरी कोण?

अजितकुमारला या पर्वात (devmanus 2) कोणाचाही धाक नाहीये असं वाटत असतानाच इन्स्पेक्टर मार्तंड जामकर (martand jamkar) यांची मालिकेत एंट्री झाली आणि मालिकेत एक रंजक वळण आलं. मार्तंड जामकर आता अजितकुमारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि जामकरला संशय आहे की अजित ह्या गावात एकटा नसणार. त्याला बज्या, नाम्या आणि डिंपल या तिघांवर शंका आहे. या तिघांपैकी कोणीतरी अजितला मदत करत असेल.नाम्या आणि बज्याची तो चौकशी करतो. त्याला कळतं की या दोघांचा यामध्ये हात नाहीये. उरली डिंपल, सेलिब्रिटी म्हणून तिला फोटो काढण्याच्या बहाण्याने स्टेशनला घेऊन जातो आणि दिवसभर बसवून ठेवतो. अजित ह्याने खूपअस्वस्थ आहे. डिंपलने जर तोंड उघडलं तर जामकरला पुरावे सापडतील. डिंपल तोंड उघडत नाही आणि याचा फायदा घेऊन अजित गावभर पसरवतो की देवमाणसाच्या पत्नीला नव्या पोलीस अधिकाऱ्याने दिवसभर स्टेशनमध्ये बसवून ठेवल आणि त्रास दिला. याच्यामुळे गावात जामकर विरोधात चर्चा सुरू होते आणि ती जामकारच्या कानावर पडते. तो प्रायश्चित्त म्हणून दोघांना घरी जेवाणाचे आमंत्रण देतो.

त्याच वेळेला अजितला जमिनीसाठी आमदाराचं बोलावणं येतं. आता दोघांपुढे नेमकं कुठे जायचं ह्याचा पेच पडतो. ते दोघे जामकारच्या घरी जातात पण त्यांना आमदारकडे जायचंय म्हणून दोघेही अस्वस्थ आहेत. जामकर त्यांना जेवण वाढतो आणि म्हणतो की साग्रसंगीत जेवण केलं आहे तुमच्यासाठी. साग्र झालं आता संगीत हवं असं म्हणून दोघांसाठी गाणं म्हणून डान्स करतो. जामकरचा हाच रांगडा आणि काहीसा विक्षिप्तपणा चाहत्यांना भावतो आहे. पण जामकारच्या अशा वागण्याला अजित- डिंपल मात्र घाबरलेले आहेत, जामकारचा यात काही डाव तर नसेल ना? जामकारचा हा पाहुणचार अजित आणि डिम्पलला महागात तर नाही पडणार? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

Web Title: Zee Marathi Serial Devmanus Twist Inspector Jamkar And Ajitkumar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top