वाहिनीनं मागितली माफी, मालिका सुरू असताना घडली मोठी चूक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zee marathi shared apology for disturbance in majhi tujhi reshimgath serial

वाहिनीनं मागितली माफी, मालिका सुरू असताना घडली मोठी चूक..

Majhi tujhi reshimgath : झी मराठी (zee marathi) वरील माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय याने प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेच्या सुरुवातरीपासून प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता जवळ आला. यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. यासाठी दोन तासांचा विशेष भाग प्रदर्शित होणार होता. परंतु एका तांत्रिक अडचणीमुळे हा भाग यशस्वी होऊ शकला नाही. रविवारी १२ जून रोजी या भागाचे प्रदर्शन होणार होते परंतु हा भाग अर्ध्यातूनच रद्द झाला. (zee marathi shared apology for disturbance in majhi tujhi reshimgath serial)

हेही वाचा: आदित्य ठाकरे यांनी केली होती दिशा पटानी सोबत डिनर डेट.. झाले होते ट्रोल..

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. काल रविवारी १२ जून रोजी नेहा आणि यशच्या लग्नाचा विशेष सोहळ्याचा भाग प्रसारित करण्यात आला. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तो भाग अर्धवट दाखवण्यात आला. त्यानंतर नुकतंच अभिनेत्री प्रार्थना बेहरेने एक पोस्ट शेअर केली आहे. 'माफी असावी, माफी असावी, माफी असावी, पुन्हा आमच्या मालिकेचा भाग पाहा आणि तुमच्या अविरत प्रेमासाठी धन्यवाद, असे प्रार्थनाने म्हटले आहे.

तर वाहिनीनेही याबाबत माफी मागितली आहे. 'काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या आजच्या विशेष भागात व्यत्यय आला.. त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज १३ जून रोजी सकाळी १० वा. आणि दुपारी ४ वा. पुन्हा एकदा दाखवणार आहोत…. त्यामुळे पाहायला विसरु नका. नेहा आणि यशच्या लग्नाचा आनंद सोहळा फक्त झी मराठीवर”, असे निवेदन झी मराठीने दिले आहे. याच निवेदनाचा एक फोटो प्रार्थनाने शेअर केला आहे.

Web Title: Zee Marathi Shared Apology For Disturbance In Majhi Tujhi Reshimgath Serial

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top