गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना
'जोवर चंद्र सूर्य तारे आहेत तोवर लता बाईंचा स्वर आसमंतात आहे' असे गौरवाचे शब्द अनेक दिग्गजांनी उद्गारले आहेत. लता मंगेशकर म्हणजे कित्येक पुढ्यांचा आवाज. ज्यांनी लहान थोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपल्या संगीतातून मंत्रमुग्ध केले. भावगीत, भक्तीगीत साऱ्यातच त्यांची मुशाफिरी होती. त्यांच्या सुमधुर आणि अजरामर गीतांचा नजराणा लवकर आपल्याला ऐकायला मिळणार आहे.
लता मंगेशकर म्हणजे संगीतप्रेमींचे भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर. जातपात, धर्म, भाषा, प्रांत अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणारी ही 'स्वरयात्रा’ नुकतीच विसावली. मात्र त्यांच्या स्वरांचे अक्षय्य चांदणे आपल्यावर सदैव बरसणार आहे. त्यांच्या गाण्यांचा, आठवणींचा अमूल्य ठेवा आपल्यासमोर रिता करत ‘स्वरलता... तुला दंडवत’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमातून त्यांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
हेही वाचा: गाढवावरून धिंड काढली तर.. तृप्ती देसाई पुन्हा भडकल्या
निवेदिका अभिनेत्री स्पृहा जोशी या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाची तसेच त्यांच्या असंख्य अज्ञात पैलूंची माहिती करून देणार आहेत. गायिका सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, प्रीती वॉरियर आणि संगीतकार मंदार आपटे यांच्या स्वरसाजाने ही मैफल रंगणार आहे. या विशेष सांगीतिक कार्यक्रमात लतादिदींच्या आठवणी आणि गाणी यांचा सुरेल संगम प्रेक्षकांना पहायला मिळेल.

lata mangeshkar
हेही वाचा: अभिनेत्रीला मिळाला पुण्याच्या टॉकरवडीचा मान.. जाणून घ्या काय आहे प्रकरण
निवेदिका अभिनेत्री स्पृहा जोशी या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाची तसेच त्यांच्या असंख्य अज्ञात पैलूंची माहिती करून देणार आहेत. गायिका सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, प्रियंका बर्वे, प्रीती वॉरियर आणि संगीतकार मंदार आपटे यांच्या स्वरसाजाने ही मैफल रंगणार आहे. या विशेष सांगीतिक कार्यक्रमात लतादिदींच्या आठवणी आणि गाणी यांचा सुरेल संगम प्रेक्षकांना पहायला मिळेल.
Web Title: Zee Talkies Gives Musical Tribute To Lata
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..