Entertainmaint news : trupti desai : गाढवावरून धिंड काढली तर... तृप्ती देसाई पुन्हा भडकल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trupti desai
कुटुंब नियोजन किटमध्ये देण्यात आलेल्या रबरी लिंगाच्या समर्थांनावरून तृप्ती देसाई यांच्यावर टीका होत होती. यावेळी बेताल टीकाकारांना ततृप्ती देसाई यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. trupti desai, fami'y planning kit, rubber penis

गाढवावरून धिंड काढली तर.. तृप्ती देसाई पुन्हा भडकल्या

राज्य सरकारच्या सार्वजानिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग दिले होते. यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली. हा प्रकार अत्यंत गैर असल्याचे सांगत अनेकांनी सरकारला धारेवर धरले. परंतु सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी मात्र प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपले मत मांडले.

हेही वाचा: अभिनेत्रीला मिळाला पुण्याच्या टॉकरवडीचा मान.. जाणून घ्या काय आहे प्रकरण

'सरकारने कोणतीही चूक केली नाही. संकुचित विचारसरणी मधून बाहेर पडून याकडे पाहायला हवे. अशा वर्कर्स ने लाज न बाळगता ग्रामीण भागात जाऊन महिलांमध्ये कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करायला हवी,' असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. देसाई या त्यांच्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असतात. या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी लोकांसमोर आपले विचार मांडले आहे.

trupti desai

trupti desai

परंतु त्यांच्या या मताला विरोध करणारेही तितकेच आक्रमक झाले. अनेकांनी त्यांच्यावर पातळी सोडून टीका केल्या, घाणेरड्या शब्दात त्यांच्यावर वैयक्तिक टिपण्या करण्यात आल्या. याचा तृप्ती देसाई यांनी तीव्र निषेध करत कठोर शब्दात टीकाकारांना झोडपले आहे. याबाबत एक सविस्तर फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

हेही वाचा: चिन्मय मांडलेकर बसलाय गाल फुगवून;फोटो शेअर करीत पत्नीने सांगितली गम्मत

तृप्ती देसाई म्हणतात...

प्रवाहाच्या विरोधात बोलायची हिंमत ठेवते, त्यामुळे गेल्या सात वर्षापासून आपल्यावरील टीका सहन करण्याची शक्ती वाढली आहे….
पण एक मात्र नक्की सांगेन, माझ्या मुद्द्याला ज्यांनी ज्यांनी विरोध केला, मला अश्लील कमेंट केल्या तेच माझ्याबरोबर सेल्फी काढायला येत असतात, त्यांच्या घरातील महिलेवर अन्याय झाला तर माझ्याकडे मदतीसाठी येत असतात आणि कमेंट बाबत जाब विचारला तर जाहीर माफी मागत असतात. कामाची शक्ती कृतीतून दाखवायची असते, जी आत्तापर्यंत मी दाखवली आणि यापुढेही नक्कीच चांगले काम करीत राहीन.
बाकी घाणेरड्या कमेंट करणाऱ्यांची मानसिकता त्यांनी स्वतः तपासली तर त्यांचे आयुष्य चांगले होईल, आम्हाला असल्या कमेंट्सने काडीमात्र फरक पडत नसतो यासाठीच ही पोस्ट.
पण आमच्या महिलांनी चुकून जर तुम्हाला शोधून चोप दिला आणि गावात धिंड काढली तर त्याला तुमची स्वतःची कमेंटच जबाबदार असेल, अशी ही पोस्ट आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Web Title: Trupti Desai Answered On Facebook Who Criticize Her About Support Of Rubber Penis In Family Planning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..