Grammy 2022:सोहळ्याच्या मंचावर भावूक झालेले दिसले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष

Grammy 2022 पुरस्कार सोहळ्यात झेलेन्सकी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना आपल्याला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
President of Ukraine, Volodymyr Zelenskyy, speaks on screen at the 64th Annual Grammy Award in Las Vegas
President of Ukraine, Volodymyr Zelenskyy, speaks on screen at the 64th Annual Grammy Award in Las VegasGoogle
Updated on

ग्रामी पुरस्कार सोहळा २०२२(The Grammy Award 2022) चं प्रसारणं भारतात आज सकाळी प्रसारित केलं गेलं. हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लास वेगासमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यात भारतातनं केवळं ए.आर.रहनाननं उपस्थिती दर्शवली होती. त्यान सोशल मीडियावर सोहळ्यातील काही क्षणचित्र आणि आपला मुलासोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं ते युद्धात होरपळून निघणाऱ्या युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी(Zelenskyy) यांचा एक रेकॉर्ड केलेला व्हिडीओ. यामाध्यमातून त्यांनी समस्त जगाला मदतीचं आवाहन केलं आहे,आपल्याला समर्थन करण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे. यंदाचा ६४ वा ग्रामी पुरस्कार सोहळा लास वेगासच्या एमजीएम ग्रॅंड ग्रार्डनमध्ये रंगला. नेहमीच या सोहळ्याला ग्लॅमरस टच पहायला मिळतो. अनेक हॉलीवूडकरांबरोबरच बॉलीवूडकरांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. संगीत क्षेत्रातील मान्यवर ग्रामी पुरस्कार सोहळ्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या पुरस्काराच्या संचलनाची जबाबदारी ट्रेव्होर नोहा याच्याकडे होती. सिल्क सोनिक,BTS,बिल्ली एलिश,एच.ई.आर आणि इतरांनी या पुरस्कारसोहळ्यात दिलेले परफॉर्मन्सेस उपस्थितांची दाद मिळवून गेले.

ग्रामी पुरस्कार सोहळ्यात झेलेन्स्कीचा तो भावूक व्हिडीओ पाहताना अनेकांना गहिवरुन आलं. झेलेन्सकी यांनी त्या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना आपल्याला सहकार्य करण्याचं आवाहन केलेलं दिसलं. त्यांनी आपल्या युद्धभूमीचं भावूक वर्णन करत हे मदतीचं आवाहन केलं आहे. कोणत्याही स्वरुपात ही मदत करु शकता असं देखील झेलेन्सकी म्हणाले आहेत. त्यांनी म्युझिकच्या माध्यमातून युक्रेनच्या भावना आपण मांडू शकता असं देखील म्हटलं आहे. एखादी भावना मग ती आक्रोशाची असो की आनंदाची,ती लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी संगीत हे योग्य माध्यम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. संगीताच्या माध्यमातून आपण युक्रेनियन लोकांचं दु:ख,भय,मरणयातना मांडू शकता हे बोलताना झेलेन्स्की भावूक झालेले दिसले. जॉन लीजेन्डच्या परफॉर्मन्स दरम्यान झेलेन्सकीचा व्हिडीओ दाखवण्यात आला. झेलेन्स्की यांचा समर्थन,सहकार्य मागणारा व्हिडीओ मंचावर मोठ्या स्क्रीनवर दाखण्यात आला. त्यात त त्यांनी सर्व जगाला संबोधून म्हटलं आहे,''युक्रेनला सहकार्य करा,तसं तुम्हाला शक्य होईल तशी मदत करा. त्यानंतर ते म्हणाले,संगीताच्या विरोधात काय असतं? नेस्तनाबूत झालेली शहरं,तिथल्या किंकाळ्या आणि मृत पावलेले लोक. या विदारक,भयानक दृश्याला संगीतानं भारुन द्या. जसं शक्य होईल तसं,आम्हाला सहकार्य करा''. झेलेन्सकी यांचा हा व्हिडीओ युक्रेनियन सिंगर मीका न्यूटन आणि कवी ल्युबा यकिमचूक यांच्या परफॉर्मन्सआधी दाखविला गेला .

President of Ukraine, Volodymyr Zelenskyy, speaks on screen at the 64th Annual Grammy Award in Las Vegas
Grammy 2022: पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकरांच्या बाबतीत घडली घोडचूक...

पुरस्कार सोहळ्यात एक सोशल मीडिया कॅम्पेनिंगची देखील सुरुवात केली गेली ज्याचं नाव आहे 'स्टॅंड अप फॉर यु्क्रेन'. यामाध्यमातून युक्रेनसाठी आर्थिक आणि अन्य माध्यमातून मदत संघटित केली जाईल. २४ फेब्रुवारीला रशियानं युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानंतर आतापर्यंत अनेत सर्वसामान्य नागरिकांनी,सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत. युक्रेनमधील कितीतरी शहर उद्धव्स्त झाली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, युक्रेनमधून आतापर्यंत १ करोड पेक्षा अधिक लोकांनी पलायन केलं आहे. रशियानं युक्रेनमधील अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. तिथे सगळीकडे आताही मृत्यूचा तांडव पहायला मिळत आहे. निपचित पडलेले मृतदेह मनाला हेलावून टाकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com