राहुल देशपांडेला 'लाल सिंह चढ्ढा'चं समर्थन भोवलं, अखेर दिलं स्पष्टीकरण..

शास्त्रीय गायक राहूल देशपांडे याने काही दिवसांपूर्वी 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटाचे समर्थन केले होते, त्यांनंतर त्याला बरेच ट्रोल केले गेले.
rahul deshpande react on trolling after sharing laal singh chaddha movie post
rahul deshpande react on trolling after sharing laal singh chaddha movie post sakal

Rahul deshpande : आधी आपल्या गायनाने आणि मग 'मी वसंतराव' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला गायक म्हणजे राहुल देशपांडे. नुकताच त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हल्ली तो सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. त्याच्या आणि त्याच्या मुलीचे विडिओ देखील बरेच चर्चेत असतात. शिवाय त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याबाबतही तो बरच काही पोस्ट करत असतो. पण सध्या तो अडचण आला आहे. त्याचं कारण ठरलंय 'लाल सिंह चढ्ढा' (laal singh chaddha) चित्रपट. (rahul deshpande react on trolling after sharing laal singh chaddha movie post)

काही दिवसांपूर्वीच त्याने 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपट पाहून एक पोस्ट लिहिली होती. आता तीच पोस्ट त्याला भोवली आहे. अखेर राहुलने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाच्या प्रीमियर शो ला राहुल देशपांडेला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर राहुल चित्रपटाविषयी कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली होती. या पोस्ट मध्ये त्याने सर्व कलाकारांचे आभार मानले होते. आमीर खान (amir khan) आणि करीना कपूरचेही (kareena kapoor) कौतुक केले होते. पुढे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आला आणि राहुलला त्याची पोस्ट भोवली.

राहुलने चित्रपटाचे समर्थन केले म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अखेर त्याने यावर उत्तर दिले आहे. राहुल म्हणाला, “नमस्कार रसिक मित्रहो !! लाल सिंग चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमीयरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे वा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही.”

पुढे तो म्हणतो,“आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये, अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती ! लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा !!” अशी पोस्ट त्याने सोशल मिडीयावर शेयर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com