#MarathaKrantiMorcha लातूरात आडत बाजार 'बंद'

सुशांत सांगवे
Saturday, 28 July 2018

मराठा समाजाला आरक्षण द्या, या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीस पाठींबा दर्शवत राष्ट्रीय गुमास्ता मंडळ आणि आडत असोसिएशनच्या वतीने शहरातील आडत बाजार बंद ठेवण्यात अाला. मराठा आंदोलनात शहिद झालेल्या काकासाहेब शिंदे, रोहन तोडकर, गजानन सोनवणे यांना या वेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

लातूर: मराठा समाजाला आरक्षण द्या, या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीस पाठींबा दर्शवत राष्ट्रीय गुमास्ता मंडळ आणि आडत असोसिएशनच्या वतीने शहरातील आडत बाजार बंद ठेवण्यात अाला. मराठा आंदोलनात शहिद झालेल्या काकासाहेब शिंदे, रोहन तोडकर, गजानन सोनवणे यांना या वेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीस पाठींबा दर्शविण्यासाठी शनिवारी सकाळी नऊ वाजता मराठा क्रांतीच्या समन्वयकांनी गुमास्ता असोसिएशन, आडत असोसिएशन, हमाल मापाडींची भेट घेतली. त्यांनी मराठा आंदोलनाची भूमिका सांगत आंदाेलनाला पाठींबा देण्याची विनंती केली. त्यानूसार उपस्थित गुमास्ता असोसिएशन, आडत असोसिएशनचे पदाधिकारी आणि हमाल मापाडींनी एकमुखी पाठींबा देत कडकडीत बंद पाळला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. 

गुमास्ता भवनात मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम गंभिरे यावेळी म्हणाले की, ‘मराठा समाजाच्या मागण्यात शेतकरी हिताच्याही मागण्याचा समावेश असून कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हा समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे. त्यामुळे ती मागणी योग्य अाहे.’ आडत असोशिएशनचा पाठींबा दर्शवत असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश सुर्यवंशी म्हणाले, ‘मराठा समाजाची वर्तमान अवस्था अत्यंत बिकट अाहे. शिक्षण घेण्यासाठी समाजातील अनेक व्यक्तींकडे पैसा नाही. आरक्षणाशिवाय त्यांची प्रगती कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीस पाठींबा दिला आहे.’

इतर समाजानेही पाठींबा द्यावा
आजवर अन्य समाजाला दिल्या गेलेल्या आरक्षणास मराठा समाजाने कसलाही विरोध केला नाही. आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याने इतर समाजाने अामच्या मागणीला पाठींबा द्यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शनिवारी करण्यात आले. त्यानंतर लगेचच लातूरातील मारवाडी समाजाने या मागणीला पाठींबा दर्शविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Latur market closed today