
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी परळीत सुरू असलेले ठिय्या आंदोलन शनिवारी अकराव्या दिवशीही सुरूच आहे. कॉंग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांनी शनिवारी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरूच आहेत.
बीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी परळीत सुरू असलेले ठिय्या आंदोलन शनिवारी अकराव्या दिवशीही सुरूच आहे. कॉंग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांनी शनिवारी ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरूच आहेत.
18 जुलैला परळीत पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघून ठिय्या आंदोलन सुरू झाले. दरम्यान, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कायम निमंत्रित सदस्या रजनी पाटील यांनी शनिवारी आंदोलनाला भेट देऊन आरक्षण मागणीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
सरकार आंदोलनाकडे आणि आरक्षण मागणीकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आरक्षण आंदोलनादरम्यान युवक आणि महिलांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा एक ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यांसमोर ठिय्या आंदोलन आणि जेल भरोचा इशारा आंदोलक संयोजकांनी दिला. दरम्यान, युसूफवडगाव (ता. केज), सुलतानपूर (ता. माजलगाव), कोळपिंप्री (ता. धारूर) येथे शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.