
अक्कलकोट शहरातील अत्यावश्यक सेवेतील म्हणजेच दवाखाने आणि औषध दुकाने वगळून इतर सर्वांचा 100 टक्के सहभाग राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सकाळी दहा वाजता सर्वजण बसस्थानक जवळील खंडोबा मंदिर येथे एकत्र जमणार आहेत.
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे.
आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन कल्याणशेट्टी,नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्यासह अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्ष,विवेकानंद प्रतिष्ठान,
वीरशैव लिंगायत समाज,अक्कलकोट तालुका मुस्लिम समाज,अक्कलकोट शहर भाजप,जनसेवा संघटना,अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, लहुजी शक्ती सेना,ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवस्थान समिती,गुरव समाज संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, जैन समाज संघटना,वीरशैव ककय्या समाज,नाभिक समाज,प्रहार जनशक्ती पक्ष, संत गाडगेबाबा परीट समाज संघटना,भारिप बहुजन महासंघ या संघटनांनी पाठिंबा दिला असून ते सर्व समाज बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून मराठा समाजाच्या सर्व न्याय्य मागण्याची पूर्तता व्हावी यासाठी जाहीर पाठिंबा देणार आहेत असे आयोजकांनी सांगितले आहे.
अक्कलकोट शहरातील अत्यावश्यक सेवेतील म्हणजेच दवाखाने आणि औषध दुकाने वगळून इतर सर्वांचा १०० टक्के सहभाग राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सकाळी दहा वाजता सर्वजण बसस्थानक जवळील खंडोबा मंदिर येथे एकत्र जमणार आहेत.
त्यानंतर मोर्चास प्रारंभ होणार आहे.हा मोर्चा विजय कामगार चौक,एवन चौक, फत्तेसिंह चौक, मेन रोड,कापड मार्केटमार्गे कारंजा चौक येथे येणार आहे. त्यानंतर या मोर्चाचे रूपांतर तेथे जाहीर सभेत होणार आहे.या मोर्चाचे संयोजन अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे ,बाबासाहेब निंबाळकर,अरुण जाधव, बाळासाहेब मोरे, विक्रम शिंदे, बंडोपंत घाटगे, राम जाधव, तम्मा शेळके, सुभाष गडसिंग, दिलीप काजळे, मनोज गंगणे, मनोज इंगुले, शितल फुटाणे, बाळासाहेब घाटगे, संदीप केत, मंगेश फुटाणे, केदार तोडकर, सुरेश कदम, ज्ञानेश्वर भोसले, अंबादास जाधव, योगेश पवार, सागर शिंदे, विशाल गव्हाणे, सागर गोंडाळ, संतोष भोसले, प्रविण घाडगे, गणेश भोसले, नाना मोरे, प्रशांत साठे, चेतन शिंदे, गोविंद शिंदे-माकणे, राजु शिंदे, सुखदेव चव्हाण आदिंसह तालुक्यातील मराठा समाज बांधव करीत आहेत.