Marathwada : दोन वर्षापासून जबरदस्ती बलात्कार करणाऱ्यावर पोलीसात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दोन वर्षापासून जबरदस्ती बलात्कार करणाऱ्यावर पोलीसात गुन्हा

उदगीर : शहरात राहणाऱ्या एका सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने एका विवाहित महिलेवर गेल्या दोन वर्षापासून दाब, धमकी देऊन जबरदस्तीने बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी (ता.१८) रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी हनुमंत केंद्रे (रा.गुत्ती) ता.जळकोट हल्ली मुक्काम उदगीर ज्ञानेश शहरातील एका मान्यवर गेल्या दोन वर्षापासून दाब धमकी देऊन सातत्याने बलात्कार केला, पोलिसात तक्रार देते म्हटल्यानंतर या महिलेस काही आरोपींकडून धमकी देण्यास लावले. अखेर या बलात्कार पिडीत महिलेने शुक्रवारी शहर पोलिस ठाणे गाठले व झालेली हकीकत सांगितली. आरोपीने त्याच्यासाठी दाराकडून दिलेल्या धमकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ऐकविले. तिच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जळकोट तालुका पदाधिकारी असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बेन यांनी सांगितले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या पदाचा दुरुपयोग करत दाब धमकी देऊन गेल्या दोन वर्षापासून शहरातील एका महिलेवर जबरी बलात्कार करून धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू असून पीडित महिलेला न्याय मिळावा यासाठी सामाजिक संघटना व विरोधी पक्षांनी पुढे येण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. हे प्रकरण पोलिसांकडून दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो यासाठी सामान्यांचा लढा उभारण्याची गरज असल्याची अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी लातूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी लक्ष घालण्याची मागणी उदगीर च्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

माहिती दडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न....

आज पर्यंत वर्तमानपत्रांना इतर बलात्कारातील गुन्ह्यांच्या आरोपींची माहिती देणारे शहर पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी या प्रकरणातील आरोपी हा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्याने माहिती देता येत नाही असे उत्तर देऊन माहिती देण्याचे टाळले. शिवाय आरोपीला सुद्धा व्हीआयपी वर्तणूक देण्यात येत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. हे प्रकरण दाखल होण्याआधी मिटविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा पोलिसांनी काळजीपूर्वक केली असल्याची चर्चाही सध्या चवीने चर्चिली जात आहे.

loading image
go to top