#SakalForMaharashtra एकत्र येऊया ! मार्ग काढूया !!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

शेतकऱ्यांना जपण्याची गरज 

मी ग्रामीण भागातून आलो असून शेतकरी कुटुंबातीलच आहे. त्यामुळे शेती अन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची मला जाण आहे. सध्या शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळेच मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. पूर्वीच्या काळी एका-एका शेतकऱ्याकडे 20-20 एकर जमीन होती अन त्यातून ते पाच पिके काढत असतं. त्यामुळे शेतकऱ्याचे कुटुंब सुखी अन समाधानी होते. मात्र, एक पिढी मूर्ख निघाली अन तिने जमिनी विकण्याचा सपाटा लावला. त्यामुळेच आता हातात दगड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. त्यातच आता प्रत्येक घटकाचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 

बुद्धीवंतांचे शहर अशी पुण्याची ओळख होती. मात्र, पेठेतील पुणे खूपच विस्तारले. लोकसंख्या वाढली. उपनगरेही मोठ्या प्रमाणात तयार झाली. त्यामुळे शहराची ओळख बदलत चालली आहे. जिथे बंगले उभे राहायला हवे होते, तिथे झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. त्यामुळे बेरोजगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ज्या प्रमाणे दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांना वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तशीच स्थिती आता शेतकऱ्यांचीही झाली आहे. शेतकरी जमातही आता दुर्मिळ होत चालली असून तिला जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आली आहे. जर आपण शेती अन शेतकऱ्यांना जपले नाही तर आतापेक्षा दहापट भयंकर परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. 

"सकाळ'ने बेरोजगारी, शेती अन शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी, यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी जी मोहीम सुरू केली आहे, तिला माझा पाठिंबा आहे. यासाठी मला जेवढी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करता येईल, ती मी नक्कीच करणार आहे. त्याचप्रमाणे पटकथा लिहून चित्रपटांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर प्रकाशझोत टाकणार आहे. 

- प्रवीण तरडे, लेखक, दिग्दर्शक 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SakalForMaharashtra comments pune