शिवसेना नगरसेवकाचा महापालिका सभागृहातच पेटवून घेण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शिवसेना नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी आंगावर राँकेल ओतून स्वतःला पेटवून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नांदेड : नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शिवसेना नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी आंगावर राँकेल ओतून स्वतःला पेटवून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

शासनाच्या आरक्षित जमिनीवर महापालिकेच्या सत्ताधारी काँग्रेसने ठराव पारित करण्याचा निर्णय घेतला या ठरावाला विरोध म्हणून कल्याणकर यांनी महापौर यांच्या डायस जवळ येऊन आंगावर राँकेल ओतून घेतले

यावेळी उपस्थित, नगरसेवक आणि पोलिसांनी तात्काळ कल्याणकर यांना धरुन बाजूला केले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कल्याणकर यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाने सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena corporators attempt to suicide in municipal hall Nanded