मद्य कंपन्यांनी थकविला तब्बल १०८ कोटींचा कर

प्रकाश बनकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरुन विभागाने २८ व २९ जुलैरोजी औरंगाबाद आणि नांदेड मध्ये सर्च ऑपरेशन करत कारवाई केली. या कंपन्यांनी मानवी वापरासाठी योग्य नसलेल्या अल्कोहोलची मंजुरी लपविली. अशा प्रकारच्या मंजुरी त्यांनी दाखल केलेल्या विवरण पत्रात दिसली नाही,

औरंगाबाद : करचुकवेगिरीच्या संशयावरुन केंद्रीय जीएसटीच्या गुप्तवार्ता विभागातर्फे औरंगाबाद तसेच नांदेड येथील मद्यनिर्मितीच्या कारखान्यांवर कारवाई केली आहे. सर्च ऑपरेशनमध्ये दोन्ही कंपन्यांनी सुमारे १०८ कोटींचा कर भरला नसल्याचे उघड झाले. त्यानुसार या करवाईनंतर एका कंपनीने अडीच कोटी रुपयांचा भरणा केला. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती केंद्रीय जीएसटीच्या गुप्तवार्ता विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे. 

करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरुन विभागाने २८ व २९ जुलैरोजी औरंगाबाद आणि नांदेड मध्ये सर्च ऑपरेशन करत कारवाई केली. या कंपन्यांनी मानवी वापरासाठी योग्य नसलेल्या अल्कोहोलची मंजुरी लपविली. अशा प्रकारच्या मंजुरी त्यांनी दाखल केलेल्या विवरण पत्रात दिसली नाही,

हेही वाचा- रशियातील मोठ्या उद्योगाला ‘ऑरिक’मध्ये ४३ एकर जागा   

अशा मंजुरींवर कोणताही जीएसटी भरला गेला नसल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. कंपनीने जुलै २०१७ ते जुन २०२० या कालावधीत ७० कोटीच्या व्यवहारावर १२ कोटी ६१ लाख जीएसटी भरणे आवश्यक असताना भरला नाही. याच कालवधीत अन्य एका व्यवहारात १२ कोटी ६१ लाखांचा तसेच ८५ कोटी ६८ लाखांचा जीएसटीचा भरणा केला नाही. यासह एकूण १०८ कोटींचा जीएसटी न भरला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका कंपनीने अडीच कोटी रुपयांचा भरणा केल्याची माहिती विभागाच्या सुत्रांनी दिली. 

हेही वाचा-  Good News : अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Video पहा)  

दरम्यान, तर २४ व २५ जुलै रोजी औरंगाबाद येथील बहुराष्ट्रीय मद्यनिर्मिती कारखाना आणि नाशिक येथील मळी आधारीत डिस्टिलरीच्या कारखान्यांवर एकाच वेळी छापे टाकत कारवाई करण्यात आली होती. यात ६० ते ७० लाखांची जीएसटी भरणे आवश्यक असतानाच संबंधित कंपनी व्यवस्थापनाने ती भरली नसल्याची माहीती त्या पत्रकात म्हटले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 108 Crore Tax Levied by liquor companies Aurangabad News