GoodNews:अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Videoपाहा) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Image 2020-07-25 at 11.34.37 AM.jpeg

औरंगाबाद शहराच्या एमआयडीसीत बजाज ऑटो आल्यानंतर शहराचा झपाट्याने विकास झाला. अशाच अँकर इंडस्ट्रीजची या भागाला गरज आहे. डीएमआयसी, ऑरिकच्या माध्यमातून बजाजप्रमाणे अँकर इंडस्ट्रीज व आणखी असेच फूड प्रोसेसिंगशी निगडित उद्योग कसे येतील, यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचे (ऑरिक) सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी शुक्रवारी (ता.२५) दिली.

GoodNews:अँकर इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग उद्योग ‘ऑरिक’मध्ये आणण्याचा प्रयत्न (Videoपाहा)

औरंगाबाद: शहराच्या एमआयडीसीत बजाज ऑटो आल्यानंतर शहराचा झपाट्याने विकास झाला. अशाच अँकर इंडस्ट्रीजची या भागाला गरज आहे. डीएमआयसी, ऑरिकच्या माध्यमातून बजाजप्रमाणे अँकर इंडस्ट्रीज व आणखी असेच फूड प्रोसेसिंगशी निगडित उद्योग कसे येतील, यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडचे (ऑरिक) सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी शुक्रवारी (ता.२५) दिली.

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार
‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात श्री. काटकर यांनी डीएमआयसी-ऑरिकअंतर्गत शेंद्रा- बिडकीनच्या विकासासंदर्भात मनमोकळा संवाद साधला. प्रारंभी ‘सकाळ’चे निवासी संपादक दयानंद माने यांनी श्री. काटकर यांचे स्वागत केले.
श्री. काटकर म्हणाले, की पुढील काळात शेंद्रा, बिडकीनमध्ये अँकर इंडस्ट्रीज आणि फूड प्रोसेसिंग या दोन बाबींशी निगडित उद्योग कसे येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नॅशनल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या संकल्पनेतून देशात जे काही प्रोजेक्ट विकसित होत आहेत, त्यात औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप (ऑरिक) हा सर्वात यशस्वी प्रकल्प आहे.

शेंद्रा येथे ८५१ हेक्‍टर क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे संपण्याच्या मार्गावर असून या ठिकाणी उद्योग येणेही सुरू झाले आहेत. कोविडमुळे चार महिन्यांपासून उद्योगांचे उत्पन्न कमी झाले आहे. मात्र, त्यांचा आस्थापना खर्च तेवढाच आहे. बाजारपेठेतील उलाढाल वाढत नाही तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही. यासाठी विविध पातळ्यांवर काम करावे लागणार आहे.

नव्या उद्योगांची चाचपणी
ऑरिकमधील शेंद्रा येथे गेल्या वर्षी ‘एलएलएमके’ या रशियन कंपनीसोबत सामंजस्य करार झाला आहे. पुढील महिन्यात ही कंपनी येणार आहे. ही कंपनी ट्रान्सफॉर्मरचे स्टील बनवते. भारतात याची निर्यात होते. यासह ‘यूके’बेस असलेल्या आरबी ग्रुपविषयीही बोलणी अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?  

बिडकीनच्या फूड पार्कसाठी दुबई येथील एमआर ग्रुपने रस दाखवला होता. हा ग्रुप पायाभूत सुविधा तसेच विमान वाहतुकीसंदर्भात काम करतो. दोन महिन्यांपासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत; परंतु त्यांच्यात अंतर्गत चर्चा सुरू आहेत. ‘इन्व्हेस्ट इंडिया’अंतर्गत विदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्नही केंद्र सरकार करत आहे.

बिडकीनसाठी फूड पार्कवर भर
बिडकीनला एक हजार एकरचा पहिला फेज पूर्ण केला आहे. त्यात ५०० एकरवर फूड पार्क विकसित करत आहे. फूड पार्कमधील फिश, मीठ, ग्रेन प्रोसेसिंग, फूड अँड व्हेजिटेबल यापैकी कुठला सेगमेंट्स यशस्वी होईल, यासाठी नामांकित कंपनीला प्रोजेक्ट रिपोर्टची जबाबदारी देण्यात आली आहे. बिडकीनमध्ये फूड पार्क, टेक्स्टाईल पार्क, मेडिकल उपकरणे (इक्विपमेंट्स), इलेक्ट्रॉनिक उपकरणे याविषयी चार वर्षांपासून अभ्यास सुरू आहे.

हेही वाचापठ्ठ्या पोलिसालाच म्हणाला, पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लिल व्हिडिओ

बिडकीनचे क्षेत्र विकसित करत आहोत. जवळपास एक हजाराचा पहिला फेज असणार आहे. डिसेंबरपर्यंत हे क्षेत्र उद्योगासाठी तयार होईल आणि साधारणतः एक नोव्हेंबरपासून येथील प्लॉटची ॲलाॅटमेंट प्रक्रिया सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ऑरिकचा हा प्रवास पुढे सरकत चालला आहे. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा व देऊळगावराजा या भागात फूड प्रोसेसिंगच्या अनुषंगाने काय करता येणे शक्य आहे, याची चाचपणी सुरू आहे.

स्किल फाउंडेशनचे प्रशिक्षण
ऑरिकमध्ये कुशल रोजगार निर्मिती करण्यासाठी ऑरिकचे स्वतःचे ऑरिक स्किल फाउंडेशन आहेत. यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली असून त्यांना दोन टप्प्यात काम करण्याचे सांगितले आहे. औरंगाबाद व जालना औद्योगिक क्षेत्रात कुठल्या स्किलची गरज आहे त्याचा सर्व्हे करून त्यानंतर ऑरिकसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची स्किल पातळी तपासणे, त्यानंतर पहिल्या टप्प्यात या मुलांना प्रशिक्षण देणे. दुसऱ्या टप्प्यात स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

दहेगाव बंगला-बिडकीन ते करमाड कनेक्टिव्हिटी
बिडकीनला दहेगाव बंगल्यावरून कनेक्टिव्हिटी देण्यात आली. यासाठी तीन लेअरचा रोड तयार झाला आहे. पुढे बिडकीन होऊन ही कनेक्टिव्हिटी करमाडपर्यंत येणार आहे. यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

इंडस्ट्रियल बेल्ट असलेल्या तळेगाव, चाकण, रांजणगाव, सुपे, नगर, नेवासा आणि बिडकीन हा नव्याने इंडस्ट्रियल कॉरिडॉर रूपाने प्रस्तावित होऊ शकतो. ऑरिकचे ‘समृद्धी’ला जोडण्याचे कामही सुरू केले आहे. त्यासाठी जागाही निश्चित केली आहे.

loading image
go to top