जालना : जिच्यावर झाला गॅंग रेप, तिला दुर्धर आजार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

जालना जिल्ह्यातील एकोणीस वर्षीय तरुणीवर मुंबईच्या चेंबूर भागात चौघांनी सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत नाजूक बनली आहे. तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, विविध तपासण्यांनंतर तिला दुर्धर आजार असल्याचे पुढे आले आहे. दुसरीकडे अत्याचार करणाऱ्या संशयितांची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

औरंगाबाद - जालना जिल्ह्यातील एकोणीस वर्षीय तरुणीवर मुंबईच्या चेंबूर भागात चौघांनी सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत नाजूक बनली आहे. तिच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, विविध तपासण्यांनंतर तिला दुर्धर आजार असल्याचे पुढे आले आहे. दुसरीकडे अत्याचार करणाऱ्या संशयितांची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

जालना जिल्ह्यातील तरुणी भावांची मुले सांभाळण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईत गेली. परंतु मुंबापुरीतील राक्षसी जबड्यात ती सापडली. तिच्यावर अत्याचार झाला. एक नव्हे, तर चौघांनी अत्याचार केल्याने तिची प्रकृती नाजूक बनली आहे. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची 30 जुलैला नोंद झाली. बेगमपुरा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता एका कर्मचाऱ्यामार्फत मुंबईतील पोलिस आयुक्तालयात गुन्ह्याचे प्रकरण सोपविले. परंतु तिसरा दिवस उजाडला तरीही मुंबईतील संबंधित पोलिस ठाण्यात गुन्ह्याचे प्रकरण पोचले नाही. परिणामी, संशयितांची ओळख अथवा नावेही समोर आलेली नसून ते अद्यापही मोकाट आहेत. 
 
फॉरेन्सिकला दिले 'स्वॅब' 
पीडित तरुणी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे. घडलेल्या प्रकाराचा तिला मोठा मानसिक धक्का बसला. अत्यावश्‍यक तपासण्या करण्यासाठी तिचे "स्वॅब' फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. 
 
विविध तपासण्या केल्या 
डॉक्‍टरांनी पीडित तरुणीच्या विविध तपासण्या केल्या. एका चाचणीत तिला दुर्धर आजार झाल्याचा एक अहवाल सकारात्मक आला आहे. त्या आजारामुळे तिच्या मेंदूवर डाग (प्रोग्रेसिव्ह मल्टिफोकल ल्युको एन केपोलोपॅथी) दिसत असल्याचे घाटी रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले. तिला अत्यावश्‍यक ते उपचार व समुपदेशन घाटी रुग्णालयात केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangrape on sick girl