esakal | सुशांतसिंह राजपूत होता तीन दिवस औरंगाबादेत
sakal

बोलून बातमी शोधा

Actor SushantSing Rajput Was In Aurangabad While Fillm Shooting Aurangabad Marathi News

औरंगाबाद दौऱ्यात सुशांतसिंह एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होता. या हॉटेलसह औरंगाबाद लेणी परिसर, बीबी का मकबरा या ठिकाणी तीन दिवस चित्रपटाचे चित्रीकरण झाले.

सुशांतसिंह राजपूत होता तीन दिवस औरंगाबादेत

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांनी रविवारी (ता. १४) आत्महत्या केली. या घटनेमुळे सिनेमासृष्टीसह त्याच्या चाहत्याला मोठा धक्का बसला. सुशांतसिंह ऑक्टोबर २०१५ मध्ये ‘एम. एस. धोनी  दी अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तीन दिवस शहरात होते. त्याच्या चाहत्यांनी त्यावेळी त्याला भेटण्यासाठी गर्दी केली होती. 

आपल्या तीन दिवस औरंगाबाद दौऱ्यात सुशांतसिंह एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होता. या हॉटेलसह औरंगाबाद लेणी परिसर, बीबी का मकबरा या ठिकाणी तीन दिवस चित्रपटाचे चित्रीकरण झाले. शहरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती मिळताच सुशांतसिंहच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी गर्दी हरवण्यासाठी बॉन्सर्स बोलवावे, लागले होते. 
होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

चित्रीकरणासाठी औरंगाबादच का? 
क्रिकेटपट्टू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात धोनीची पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि आताची पत्नी साक्षी रावतमुळे धोनीचे औरंगाबादशी नाते जुळले. साक्षीला भेटण्यासाठी धोनी औरंगाबादला आला होता. त्यावेळी धोनीने औरंगाबाद लेणी, विद्यापीठ परिसर, हनुमान टेकडी, बीबी-का-मकबरा परिसरात फेरफटकाही मारला होता. या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासाठी सुशांतसिंह औरंगाबादला आला होता. 

चमू शहरात 
या चित्रीकरणासाठी मुख्य अभिनेता सुशांतसिंह राजपूतसह दिग्दर्शक, कॅमेरामन, स्पॉटबॉयसह सगळा चमू शहरात दाखल झाला होता. रविवारी सकाळपासून सलग तीन दिवस शूटिंग सुरू होते. त्यावेळी सुशांतसिंह रिक्षातून शहरात फिरला होता. त्यावेळी चित्रीकरणासाठी अभिनेत्री कियारा अडवाणीही शहरात आली होती. तिनेही सुशांतसिंह रिक्षातून शहरात फेरफटका मारला होता. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात