esakal | शेतकऱ्यांनो सावधान!!! तीन दिवस आहे जोरदार वादळी वारा
sakal

बोलून बातमी शोधा

Weather

औरंगाबाद शहर व जिल्हा परिसरात १३ ते १५ मे या तीन दिवसांच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट असणार आहे. तसेच पाचव्या दिवशी म्हणजेच १७ मे रोजी तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनो सावधान!!! तीन दिवस आहे जोरदार वादळी वारा

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्हा परिसरात १३ ते १५ मे या तीन दिवसांच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट असणार आहे. तसेच पाचव्या दिवशी म्हणजेच १७ मे रोजी तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

याशिवाय जालना जिल्ह्यात हवेचा वेग जास्त राहणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागातर्फे देण्यात आला आहे. मुख्यत्वेकरून परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत १४ मे रोजी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट असणार आहे.

१४ मेव्यतिरिक्त इतर दिवशी वादळी वारे (वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास) असेल, अशीही माहिती देण्यात आली. सध्या शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मंगळवारी (ता.१२) उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांत तुरळक पाऊस झाला, तर सोसाट्याच्या वाऱ्याने काही घरांवरील पत्रेही उडून गेल्याच्या घटना समोर आल्या होत्या. उन्हाळी शेतमाल काढणी केलेला झाकून ठेवताना तसेच काढणीपश्‍चात शेतमाल काढताना हवामानाच्या ऊन-सावलीच्या खेळामुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांत मात्र बुधवारी (ता. १३) तुरळक भागात पाऊस झाला.

नांदेड व लातूर जिल्ह्यात १४ मे रोजी केवळ विजांचा कडकडाट असेल. ता. १५ रोजी तुरळक पावसाची शक्यता आणि १६ रोजी विजांचा कडकडाट असण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात १४ ते १६ मेदरम्यान तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट तसेच वादळी वारे राहण्याची शक्यता आहे.
- कैलास डाखोरे, प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मोसम सेवा विभाग
 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

go to top