औरंगाबादचा प्रणव कोरडे ठरला राष्ट्रीय लाॅन टेनिस स्पर्धेचा विजेता

ई सकाळ टीम
Monday, 1 February 2021

प्रणवने १६ वर्षांखालील वयोगटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा सर्वेश झंवर याचा ६-२,६-३ असा पराभव करित विजय मिळविला आहे.

औरंगाबाद : इंदूर ( मध्य प्रदेश) येथे शुक्रवारी पार पडलेल्या १६ वर्षांखालील एआयटीए राष्ट्रीय लाॅन टेनिस स्पर्धेत औरंगाबादचा प्रणव कोरडे विजेता ठरला आहे. तसेच त्याने दुहेरीतही उपविजेतेपद मिळविले आहे. प्रणवने १६ वर्षांखालील वयोगटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा सर्वेश झंवर याचा ६-२,६-३ असा पराभव करित विजय मिळविला आहे.

शेवटच्या फेरीत पोचण्याआधी प्रणवने उपांत्यपूर्व फेरीत नील जोगळेकर याच्यावर ६-४, ६-७,६-१ आणि उपांत्य फेरीत मध्य प्रदेशचा अविरल शर्मावर ६-४,७-६ अशी मात केली होती. या स्पर्धेत प्रणवने दुहेरीत जयनीशच्या साथीने उपविजेतेपद पटकाविले. प्रणवला वाय.एस.के.टेनिस अॅकॅडमीचे प्रशिक्षक राहुल उगलमुगले यांनी मार्गदर्शन केले आहे.

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Pranav Korde Won National Lawns Tennis